0
मुंबईः मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचे वेडिंग रिसेप्शन 14 डिसेंबर रोजी वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सस्थित जियो गार्डनमध्ये पार पडले. रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स पोहोचले होते. यावेळी हेमा मालिनी यांनी त्यांच्या दोन्ही मुली आणि जावयांसोबत रिसेप्शनला हजेरी लावली होती. पण धर्मेंद्र मात्र यावेळी अनुपस्थित होते. हेमा यांच्या मुली अर्थातच ईशा आणि आहना आणि त्यांचे पती भरत तख्तानी आणि वैभव वोहरा यावेळी एकाच फ्रेममध्ये दिसले. याशिवाय अभिनेत्री दीया मिर्झा पती साहिल संघासोबत पोहोचली होती. ईशा आणि आनंद यांचे 12 डिसेंबर रोजी मुकेश अंबांनीच्या अँटीलिया या निवासस्थानी लग्न झाले.


29 वर्षांनी लहान पत्नीसोबत पोहोचले कबीर बेदी...

ईशा-आनंद यांच्या रिसेप्शनमध्ये अभिनेते कबीर बेदी त्यांच्यापेक्षा वयाने 29 वर्षांनी लहान असलेल्या पत्नीसोबत पोहोचले होते. परवीन दुसांज हे त्यांच्या पत्नीचे नाव असून 2016 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. परवीन ही अभिनेता आफताब शिवदासानीची पत्नी निन दुसांजची बहीण आहे. कबीर आणि परवीन यांच्याव्यतिरिक्त बॉलिवूडमधून सनी देओल, एकता कपूर, जितेंद्र, तुषार कपूर, जहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे, बोमन ईराणी, रितेश देशमुख, सुभाष घई, कार्तिक आर्यन, नील नितिन मुकेश, अदनान सामी आणि क्रिकेटर क्रुणाल पांड्या त्याची पत्नी पंखुडीसोबत पोहोचला होता. 12 डिसेंबर रोजी झालेल्या लग्नसोहळ्यालाही बॉलिवूडकरांची मांदियाळी बघायला मिळाली होती.

गुलाबाची फुले आणि झुमरनी सजवण्यात आले होते रिसेप्शन स्थळ...

रिसेप्शन स्थळ गुलाब आणि हाइड्रेंजियाच्या फुलांनी सजवण्यात आले होते. ही फुले जगभरातून मागवण्यात आली होती. प्रवेशद्वारावर भव्य सजावट बघायला मिळाली. शिवाय मोठमोठे झुमर लावण्यात आले होते.

इटलीतील लेक कोमो येथे सप्टेंबर महिन्यात साखरपुडा...
ईशा आणि आनंद पीरामल एकत्र शिकले आहेत. दोघे बालपणापासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. महाबळेश्वर येथे याचवर्षी आनंदने ईशाला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांचा यावर्षी सप्टेबर महिन्यात इटलीतील लेक कोमो येथे साखरपुडा झाला होता.

Post a comment

 
Top