0

करणची तिसरी पत्नी आहे बिपाशा बसू, पहिले लग्न फक्त 10 महिने टिकले होते...


 • मुंबईः अभिनेत्री बिपाशा बसूचा नवरा करण सिंह ग्रोवर अलीकडेच कुबड्यांच्या मदतीने चालताना दिसला. करणच्या पायाला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. पण त्याचा अपघात झालेला नाही. तर जिममध्ये गरजेपेक्षा अधिक वर्कआऊट केल्याने तो जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला आता कुबड्यांची मदत घ्यावी लागतेय. करणचे सासरे हीरक बसू यांनी नुकतीच त्याची भेट घेऊन तब्येतीची विचारणा केली.

  अतिवर्कआऊट ठरु शकते डोकेदुखी... 
  रिपोर्ट्सनुसार, जास्त वर्कआऊट केल्याने जखमी झाल्याचे स्वतः करण सिंह ग्रोवरने सांगितले आहे. त्याच्या पायाच्या नसा ताणल्या गेल्याने त्याला चालताना त्रास होतोय. करण म्हणाला, जिममध्ये वर्कआऊट करताना स्वतःची काळजी घ्या, अन्यथा दुखापत होऊ शकते. मी अशा अनेक लोकांना ओळखतो, ज्यांच्यासाठी हार्डकोर वर्कआऊट डोकेदुखी ठरली आहे. करण आता हळूहळू रिकव्हर होतोय.

  करण सिंग ग्रोवरची तिसरी पत्नी आहे बिपाशा...
  23 फेब्रुवारी 1982 रोजी दिल्लीत जन्मलेल्या 36 वर्षीय करणने आतापर्यंत तीनदा लग्न केले आहे. बिपाशा बासू करण सिंग ग्रोवरची तिसरी पत्नी आहे. याअगोदर दोनदा लग्नगाठीत अडकलेल्या करणने पहिले लग्न 2008 मध्ये टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत केले होते. पण फक्त दहा महिनेच हे लग्न टिकले. त्यानंतर 2012 मध्ये करणने त्याची को-स्टार जेनिफर विगेंटसोबत दुसरे लग्न थाटले. पण हे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये दोघे विभक्त झाले. त्यानंतर 30 एप्रिल 2016 मध्ये करणने 'अलोन' या चित्रपटात त्याची को-स्टार राहिलेल्या बिपाशा बसूसोबत तिसरा संसार थाटला. त्यांच्या लग्नाला सलमान खान, डिनो मोरिया, सोनम कपूर, प्रिती जिंटा आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

  'अलोन' चित्रपटादरम्यान वाढली जवळीक...
  बिपाशा आणि करण यांची मैत्री अलोनच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री लोकांना फार आवडली. यानंतर दोघे अनेकवेळा सोबत दिसले.Bollywood Actress Bipasha Basu Husband Karan Singh Grover Injured in gym

Post a Comment

 
Top