0
दलालांसोबत असलेल्या वीस वर्षांच्या तरुणीची सुटका

नागपूर - नागपुरात कारमध्ये सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी रात्रीच्या वेळी वर्दळ नसलेल्या ठिकाणांवर संशयास्पद परिस्थितीत उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या तपासणीचे अभियान सुरू केले आहे.

मागील तीन ते चार महिन्यांत नागपूरमध्ये पोलिसांनी व्यापक प्रमाणात छापे घालून सेक्स रॅकेटचे प्रकार उघडकीस आणले आहेत. नागपुरातील उच्चभ्रू वस्त्यांमधील इमारती, हॉटेल, लॉजेससह काही ब्यूटी पार्लर्समध्येही सेक्स रॅकेट सक्रिय असल्याचे आढळून आले होते. मात्र, पोलिसांच्या वाढत्या कारवाईमुळे आता कारमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी नागपुरातील दीपकनगरात उघडकीस आला. पोलिसांनी माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यावर छापा घातला. अंधारात उभ्या करण्यात आलेल्या कारमध्ये मागील सीट काढून चक्क बेड तयार करण्यात आल्याचे आढळून आले. कारच्या काचांना काळी फिल्म लावली गेली होती. पोलिसांनी योगेश शाहू आणि राहुल गवतेल या दोन दलालांना अटक केली. दरम्याानय, गेल्या काही दिवसांपासून नागपुरात हे सेक्स रॅकेट सुरू असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच गेल्या वर्षभरात नागपुरात अनेक हत्या, छेडछाड यासारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दलालांसोबत असलेल्या वीस वर्षांच्या तरुणीची सुटका
दलालांसोबत तेथे आलेली २० वर्षे वयाची तरुणी विद्यार्थिनी असल्याचे आणि तिला दिशाभूल करून तेथे आणले गेल्याचे चौकशीत आढळून आल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची आम्ही अतिशय गंभीर दखल घेतली अाहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळी वर्दळ नसलेल्या ठिकाणांवर संशयास्पद स्थितीत उभ्या वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना पोलिस पथकांना दिल्या आहेत. सामान्य परिस्थितीत रात्रीच्या गस्तीत पोलिसांकडून संशयास्पद वाहनांची तपासणी होतेच. मात्र, या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन विशेष सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.sex racket being operated from a car in nagpur

Post a Comment

 
Top