0
महाबळेश्वर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी सकाळी आरक्षणासाठी उभारलेल्या लढय़ात बलिदान दिलेल्या 42 बांधवांना श्रध्दांजली वाहण्यासाठी व आरक्षणाच्या लढाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे साथ देणाऱया विविध जाती धर्माचा समाज, प्रशासन अधिकारी व मुख्यमंत्र्यांसह मंत्री महोदय़ांचे आभार मानण्यासाठी भव्य विजयी मिरवणुकीसह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
   सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर अनेक आंदोलने झाली. गेल्या काही वर्षांपासून ‘मराठा क्रांती मोर्चा’ने अनेकवेळा केलेल्या मागण्या मराठा बांधवांनी बलिदान देऊन केलेल्या संघर्षनंतर मराठा आरक्षणासंदर्भातील महत्वपूर्ण विधेयक सर्वानुमते मंजूर झाले. या विधेयकात मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 16 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून या ऐतिहासिक निर्णयानंतर महाबळेश्वरमध्ये फटाके फोडून मोठा जलोष करण्यात आला होता, तर सकल मराठा समाजच्या वतीने आरक्षणाच्या लढाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे साथ देणाऱया विविध जाती धर्माचा समाज, प्रशासन अधिकारी व मुख्यमंत्र्यांसह मंत्री महोदयांचे आभार मानण्यासाठी भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात मंगळवारी सकाळी कोळी अळी येथील जननीमाता मंदिर येथून झाली. ही मिरवणूक एसटी स्थानक-सुभाष चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून छ. शिवाजी चौक येथे आली. या विजयी मिरवणुकीच्या पुढे छ. शिवाजी महाराजांच्या वेशातील तरुण व बालचमू होते, तर मागील बाजूस मराठा बांधवांसह भगिनींची संख्या लक्षणीय होती. हातामध्ये भगवे झेंडे घेऊन मिरवणुकीत मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. येथील छ. शिवाजी महाराज चौकात मिरवणूक आल्यानंतर मिरवणुकीचे रूपांतर मेळाव्यामध्ये झाले. प्रारंभी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. तसेच आरक्षणासाठी उभारलेल्या लढय़ात बलिदान दिलेल्या 42 बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
 महाबळेश्वर तालुका सकल मराठा समाजाचे दिलीप वागदरे, पंचायत समिती सदस्य संजुबाबा गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, यशवंत घाडगे, सी.  डी. बावळेकर, विजय भिलारे, बाबुदादा सपकाळ आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
    यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते बाळासाहेब दादा भिलारे, पंचायत समिती सभापती रुपाली राजपुरे, उपसभापती अंजना कदम, लीलाताई शिंदे, विमल ओंबळे, वनिता जाधव, दत्तात्रय वाडकर, सूर्यकांत शिंदे, तुकाराम बावळेकर, रामदास जाधव, हरिभाऊ सपकाळ, राजू गुजर, किसन भिलारे, बाळासाहेब कोंढाळकर, अरुण शिंगरे, दीपक बावळेकर, राजेंद्र राजपुरे, संजयराव मोरे, प्रवीण भिलारे, चंद्रकांत उत्तेकर, संतोष शिंदे, लक्ष्मण कोंढाळकर, आनंद उत्तेकर, सुभाष कदम, रविंद्र पवार, विजय नायडू, अरुण सकपाळ, सचिन वागदरे, किसन खामकर, गोविंद कदम, नाना कदम, वैशाली मिसाळ, आरडे, नितीन परदेशी, धोंडिराम जंगम, संजय पार्टे, भाऊ जाधव, आनंद जाधव, पप्पू जाधव, लक्ष्मण मोरे, तुकाराम पाटील, दीपक वर्पे, गोविंद पाटील, बापू बिरामणे, महेंद्र पांगारे, संतोष पवार, राहुल शेलार, सचीन पवार, राजेश सोंडकर, संजय ओंबळे, नाना जाधव, सूर्यकांत पांचाळ, अशोक फळणे, अंकुश बावळेकर, गजानन फळणे, नंदकुमार बावळेकर, संजय जाधव, विजय हवालदार, किसनशेठ शिंदे, सुभाष  सोंडकर, संतोष जाधव, संजय उत्तेकर यांच्यासह विविध पक्षाचे संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

 
Top