0
फ्रेंच कँप अकॅडमीमध्ये घेत होते शिक्षण

अमेरिकेत आग लागल्यामुळे तीन भारतीय मुलांसोबत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तिघेही सख्खे बहीण भाऊ होते. दोन दिवसांपुर्वीच ते ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी कोल्लिरविले येथे राहणा-या कारी कॉड्रिटच्या घरी आले होते. कारीच्या घरात रात्री 11 वाजता अचानक आग लागली. तिचे पती आणि मुलंही त्यावेळी तिथे उपस्थित होते. पण ते घरातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. या तीन भावंडांमध्ये दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. तिघांचे वय 14 ते 17 वर्षांच्यामध्ये आहे. चर्चने जारी केलेल्या पत्रात हे भावंड मिशनरी कुटूंबातील होते. कारीचे पती आणि मुलावर उपचार सुरु आहे, ते लवकरात लवकर ठीक होतील. या भावंडाच्या वडिलांचे नाव श्रीनिवास नाइक आहे आणि आईचे नाव सुजाता आहे. ते मुळचे तेलंगानाच्या नालगोंडा जिल्हा येथिल आहेत.
श्रीनिवास अमेरिकेचे पादरी म्हणून काम करायचे आणि गेल्यावर्षी तेलंगानात परतले होते. पण त्याचे मुलं शिक्षणासाठी मिसिसिपीमध्ये फ्रेंच कँप अकॅडमीमध्ये थांबले होते. 23 डिसेंबरला लागलेली ही आग 20-30 मिनिटात नियंत्रणात आली. तेव्हा घरातून खुप धूर निघत होता. 

आग का लागली याचा तपास सध्या सुरु आहे. येथे स्मोक डिटेकटरही लावले आहेत पण कोणताही अलार्म वाजला नाही. त्यावेळी घरात खुप मुलं होते असे सांगितले जातेय. पण एकुण किती लोक होते याविषयी काही माहिती मिळालेली नाही.indian siblings died in christmas eve fire in america

Post a Comment

 
Top