0
 • Bhima Koregaon case : special squad Establishment for the arrest of the perpetratorsपुणे - काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी राेजी दाेन गटांत दंगल उसळून माेठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले हाेते. याप्रकरणी अात्तापर्यंत एकूण २२ गुन्हे दाखल झाले असून त्यातील १५०० पेक्षा अधिक अाराेपींच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पाेलिस अधीक्षकांकडून विशेष तपास पथकाची (एसअायटी) स्थापना करण्यात अाली अाहे. यामार्फत सर्व फरार अाराेपींना अटक करण्यासाठी विशेष माेहीम हाती घेण्यात असल्याचे लेखी अाश्वासन अपर पाेलिस अधीक्षक संदीप जाधव यांनी दिल्याचे असल्याची माहिती रिपब्लिकन युवा माेर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  डंबाळे म्हणाले, अातापर्यंत १५०० पैकी केवळ १०४ अाराेपींना अटक करण्यात अाली असून अाठ अॅट्राॉसिटी गुन्ह्यांसह २२ गुन्ह्यांपैकी एकाही गुन्ह्यात अद्याप पाेलिसांनी न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केलेले नाही. अाराेपी सापडत नसल्याने दाेषाराेपपत्र दाखल केले नसल्याचे स्पष्टीकरण पाेलिसांनी दिले अाहे.
  वढू मध्ये कलम १४४ लावण्याचा प्रयत्न : डंबाळे 
  राहुल डंबाळे म्हणाले, गेल्यावर्षी काेरेगाव-भीमा याठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर अांबेडकरी जनतेने शांततेने यावर्षी कार्यक्रम स्थळी यावे अाणि साेशल मीडियावरील काेणत्याही भडकाऊ मेसेजला बळी पडू नये. यंदा देशभरातून लाेकांचा प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा अाहे. काेरेगाव-भीमा परिसरात ३१ डिसेंबर व एक जानेवारी राेजी प्रशासनाने पाणी व्यवस्था, प्रकाश याेजना, शाैचालय व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा, नाष्टा व्यवस्था करावी, अशी अाम्ही मागणी केली अाहे. पाेलिसांनी यंदा २८०० पाेलिसांचा बंदाेबस्त पुरवू, असे सांगितले अाहे. काेरेगाव-भीमा येथे काेणतेही दुकान बंद राहू नये यासाठी पाेलिस बाेलणी करत अाहेत. तसेच पोलिस येथे कलम १४४ लावण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याठिकाणी राज्यभरातून नागरिक येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकार आणि पोलिस विभाग सतर्क झाला असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
  काेरेगाव भीमाला राष्ट्रीय स्मारक करा 
  काेरेगाव-भीमा येथील जयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन युवा माेर्चातर्फे करण्यात अाली अाहे. २००४ मध्ये यास तीर्थस्थळ व पर्यटन स्थळ म्हणून घाेषित करण्याची प्रक्रिया अवलंबली गेली हाेती. तसेच मागील वर्षी डाॅ.अांबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अांबेडकर स्मारकांच्या विकासासाठीच्या कृती कार्यक्रमात काेरेगाव-भीमा स्तंभाचा समावेश करून त्यासाठी दाेन काेटी रुपयांची प्राथमिक तरतूद करूनही अद्याप सदर पैसे खर्च करण्यात अाले नाहीत. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी १२ डिसेंबर पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे अांदाेलन करण्यात येणार असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.
  ...तर यंदाही दंगल होऊ शकते : आंबेडकर 
  पुणे | गेल्या वर्षी स्थानिक गावकऱ्यांनी अचानक बंद पुकारल्याने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी जनतेचे मोठे हाल झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावी. मागील वर्षी ज्या गावगुंडांनी उपद्रव माजवला होता त्यांना पोलिसांनी अटक करावी; अन्यथा कोरेगाव भीमा येथे यंदाही दंगल घडू शकते, अशी चिंता रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.

  आंबेडकर म्हणाले, रिपब्लिकन सेनेच्या वतीने कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी दरवर्षी जाहीर सभा घेतली जाते. या वर्षी सरकारने अद्याप आम्हाला परवानगी दिली नाही. पण काहीही झाले तरी आम्ही हा कार्यक्रम घेऊच. यादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

Post a Comment

 
Top