स्वस्तात मोबाइल मिळवण्याची धडपड
औरंगाबाद- एका दालनाच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री झरीन खान शुक्रवारी शहरात आली. तिला पाहण्यासाठी आलेल्या तरुणांत तुंबळ हाणामारी झाली. तिला जवळून पाहण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका चाहत्याला झरीनने कानशिलात लगावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कॅनॉट परिसरात शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला.
स्वस्तात मोबाइल मिळवण्याची धडपड
उद्घाटनप्रसंगी भरघोस सूट असल्याने स्वस्तात मोबाइल मिळवण्यासाठी तरुणांनी गर्दी केली. दुकानात लवकर नंबर लागावा तसेच झरीनला पाहण्यावरून दोन गटांत वाद झाले. सुरक्षेसाठी तैनात बाऊन्सरने तरुणांवर हात उगारला. वाद वाढताच हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत सिडको पोलिसांकडे कुठलीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment