0

मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे जवळपास सर्वच ब्ल्यूचिप शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.


मुंबई- जागतिक बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्याचा भारतीय बाजारावरही परिणाम दिसून आला. चारही बाजूंनी झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे शुक्रवारी मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स ६८९.६० अंकांच्या घसरणीसह ३५,७४२ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी १९७.७० अंकांच्या घसरणीसह १०,७५४ या पातळीवर बंद झाला. आयटी, वाहन आणि एफएमसीजी निर्देशांकासह सर्वच निर्देशांक लाल निशाणीवर बंद झाले. विशेष म्हणजे सर्वाधिक घसरण मोठ्या शेअरमध्ये नोंदवण्यात आली.

निफ्टी-५० मध्ये ५.४८ टक्क्यांची घसरण झाली असून इंडियन ऑइल कॉर्पमध्ये (आयओसी) सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त यूपीएलमध्ये ४.४६ टक्के, अदानी पोर्ट्समध्ये ३.७५ टक्के, मारुती सुझुकीमध्ये ३.४७ टक्के, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्समध्ये ३.४५ टक्क्यांची घसरण नोंदवली.
मोठ्या शेअरमध्ये घसरण 
मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे जवळपास सर्वच ब्ल्यूचिप शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. यात टीसीएसमध्ये ३ टक्के, आरआयएलमध्ये २.५६ टक्के, एचडीएफसी बँकेत १.१४ टक्के, एचयूएलमध्ये १.६५ टक्के, आयटीसीमध्ये २ टक्के, एचडीएफसीमध्ये १.५३ टक्के, इन्फोसिसमध्ये ३.१६ टक्के, मारुती सुझुकीमध्ये ३.४९ टक्के, आयसीआयसीआय बँकेत २.४६ टक्के, एलअँडटीमध्ये दोन टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.Falling Share market due to global gestures

Post a Comment

 
Top