सामान्य नागरिकांसाठी आले 'अच्छे दिन'.
बिझिनेस डेस्क- जीएसटी काउंसिलची शनिवारी झालेल्या बैछठकीत सामान्य नागरिकांसाठी अनेक चांगल्या घोषणा करण्यात आल्या. या अंतर्गत मानसरोवर किंवा हज सारख्या धार्मिक यात्रेंसाठीचे हवाई प्रवास स्वस्त होणार आहे.
असे यामुळे झाले कारण आधी एअरलाइंसचे धार्मिक यात्रेवरील GST चे दर 18% होते, तर सामान्य यात्रेसाठी GST चे दर इकनॉमी क्लासमध्ये 5% आणि बिजनेस क्लासमध्ये 12% होते. आता विशेष धार्मिक यात्रेंसाठी GST चे दर सामान्य हवाई यात्रेप्रमाणेच असतील. त्यामुळे धार्मिक यात्रेचे प्रवास स्वस्त होणार आहेत.
अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी काउंसिलच्या बैठकीनंतर सांगितले की, जीएसटी काउंसिलने गाड्यांचे थर्ड पार्टी वीमा आणि सिनेमा टिकटालाही स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, सीमेंट आणि ऑटो पार्ट्सना सोडून बाकी सामान्य लोकांच्या वापराच्या वस्तुंवरील कर 18 टक्के किंवा त्यापेक्षाही कमी असेल.

Post a Comment