0
छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा संभाजी उद्यानात तात्काळ बसवा नाही तर कार्यकर्त्यांचा उद्रेक होईल असा इशारा संभाजी ब्रिगेडेने दिलाय. 

पुणे : पुण्याच्या संभाजी उद्यानातून नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने उखडून फेकला होता. तो पुन्हा बसवण्यास संभाजी ब्रिगेड तयार आहे. मात्र याच उद्यानात हा पुतळा लावण्याऐवजी अन्य कुठेही पुतळा बसवण्याची सूचना संभाजी ब्रिगेडने दिलीय. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा संभाजी उद्यानात तात्काळ बसवा नाही तर कार्यकर्त्यांचा उद्रेक होईल असा इशारा संभाजी ब्रिगेडेने दिलाय.

'पुतळा इतरत्र बसवा'
 मनपा संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात चालढकल करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय.

'छत्रपती संभाजी उद्यानात, फक्त छत्रपती संभाजी महाराजांचाच पुतळा असला पाहिजे. राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानात नको', अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.नाटककार गडकरींचा पुतळा पुन्हा बसवण्यास संभाजी ब्रिगेड तयार पण...

Post a comment

 
Top