0

या कारणावरून झाला मॅचमध्ये वाद, वाचवण्यासाठी मॅच रेफरीलाही करावी लागली मध्यस्थी.


स्पोर्ट्स डेस्क - बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्या शनिवारी झालेल्या टी-20 सिरीजच्या अखेरच्या सामन्यात नो-बॉलवरून वाद निर्माण झाला. या वादामुळे सामना आठ मिनिटांपर्यंत थांबलेला होता. अंपायर तनवीर अहमद यांच्या एका चुकीमुळे खेळाडू आणि अंपायर यांच्या वाद सुरू झाला.


सामन्यात ओशेन थॉमसच्या चेंडूवर लिटन दासचा झेल शरफेन रदरफोर्डने घेतला. पण अंपायरने तो नो बॉल दिला. रिप्ले पाहिल्यानंतर लक्षात आले की, हा चेंडू नियमानुसार योग्य होता. यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट अंपायरशी वाद घालू लागला. त्यानंतर मॅच रेफरीला मध्यस्थीसाठी यावे लागले. वेस्टइंडीजचे प्लेयर्स मॅच खेळायलाच तयार नव्हते. ते खेळायला नकार देत होते. त्यानंतर जवळपास 8 मिनिटे झालेल्या वादानंतर काहीही झाले नाही आणि लिटन दास क्रीजवर कायम राहिला. विशेष म्हणजे पुढच्या बॉलला फ्री हिट मिळाली आणि फलंदाजाने षटकार ठोकला.

Post a Comment

 
Top