0
आपला मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे कार्य करतो, तुमच्या आहारात अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे बुद्धी तल्लख

  • आपला मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे कार्य करतो. 1) एखाद्या विषयाचे ग्रहण करणे (धी), 2) त्याविषयीचे ज्ञान संरक्षित ठेवणे (धृती), 3) योग्य वेळी असलेल्या ज्ञानाचे स्मरण होणे (स्मृती) अशा तीन टप्प्यांत मेंदूचे कार्य चालते. या तीनही टप्प्यांवर मेंदूचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते, अन्यथा स्मरणशक्तीशी निगडित साध्या विसरभोळेपणापासून ते अल्झायमर्स डिसिजसारखे आजार होऊ शकतात. येथे जाणून घ्या, तल्लख बुद्धिसाठी आहार कसा असावा...


    रूचिरा (अॅव्होकॅडो) 
    यामध्ये असणारे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स मेंदूतील रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करतात. यामुळे शरीराच्या या भागाला जास्त ऑक्सिजन मिळतो.

    सफरचंद 
    यातील तत्त्वांमुळे डिमेन्शियाशी (मानसिक रोग) लढण्याचे गुण असतात. यातील व्हिटॅमिन-सी अल्झायमरपासून बचाव करण्यास परिणामकारक आहे.

    चॉकलेट 
    चॉकलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोकोमुळे मेंदूमध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया थांबवते. जी मेंदूशी संबंधित आजारासाठी कारणीभूत आहे.

    ग्रीन टी 
    यातील अँटिऑक्सिडंट्स (ईजीसीजी) मेंेदूला निरोगी ठेवतात. तसेच जास्त प्रथिने निर्माण होण्यापासून थांबवते.food for sharp mind tips in marathi

Post a Comment

 
Top