0
गुजरातमधील डांगमध्ये शाळेच्या सहलीची बस दोनशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० विद्यार्थी ठार झाले असून २० विद्यार्थी जखमी झाले. या घटनेत २० विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. एका खासगी क्‍लासचे विद्यार्थी डांग येथील ऐतिहासिक वास्‍तूंना भेट देण्यासाठी गेले होते. सर्व विद्यार्थी सूरतमधील अमरोली येथील आहेत. हा अपघात शनिवारी सायंकाळी सात वाजता झाला.

अपघातानंतर स्‍थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत कोसळलेल्या बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. नागरिकांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत शासकीय मदत दिली.  अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना डांगमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वीस विद्यार्थी गंभीर असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाला अपघाताची माहिती मिळताच मृत आणि जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातातील विद्यार्थ्यांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बसमध्ये सातवीचे विद्यार्थी जास्‍त होते. विद्यार्थ्यांबरोबर खासगी क्‍लासचे शिक्षकही होते.

Post a Comment

 
Top