25 वर्षांपर्यंत श्रीमंतांसोबत राहणा-या फोटोग्राफरने सांगितले सीक्रेट
न्यूयॉर्क. अमेरिकेतील फोटोग्राफर लॉरेन ग्रीनफील्डने जगभरातील श्रीमंतांची लाइफस्टाइल जवळून जाणुन घेण्यात आपले 25 वर्षे घालवले. त्याने या लोकांचे खास क्षण कॅमेरात कैद केले. लॉरेनने यासाठी 1992 मध्ये एक अनोखा प्रोजेक्ट सुरु केला होता. हा प्रोजेक्ट यशस्वी ठरला. आता त्याच्याजवळ अशा फोटोजचे कलेक्शन आहे. यामध्ये लॉरेनने जवळपास 650 फोटोग्राफ्स 'जनरेशन वेल्थ' नावाच्या पुस्तकात पब्लिश केले आहेत.
य्वोन जूला आहे गोल्फचा शौक
हा फोटो (वरचा) शंघाईची प्रसिध्द केबल इंडस्ट्री हुईयांगच्या व्हाइस बोर्ड चेअरमन वोन जू यांचा आहे. त्या घरात गोल्फची प्रॅक्सिस करताना दिसत आहे. जू यांना गोल्फचा खुप शौक आहे आणि त्यांनी घरामध्ये मैदान बनवले आहे. यासोबतच त्यांचे घर एखाद्या महालापेक्षा कमी नाही. घरात जगभरातील सर्वात महागड्या वस्तूंचे कलेक्शन आहे.

Post a Comment