संचालक मंडळावर गुन्हे नोंद करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे आदेशदेवून याचिका निकाली काढल्या.
औरंगाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील हावरगाव ( ता. कळंब) शंभू महादेव साखर कारखान्याच्या उसाची थकीत रक्कम जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी शेतकऱ्यांना अदा करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले. शेतकऱ्यांनी २०१७-२०१८ मध्ये ५९ हजार २० टन ऊस गाळपास दिल्यानंतर त्यांच्या उसाची देयके अदा केली नसल्याने त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती.
साखर आयुक्त यांना तक्रार दिली. त्यांनी ९६९.०२ लाख रुपयांत कारखान्याचा लिलाव जाहीर केला होता. याला वैद्यनाथ सहकारी बँकेने खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने लिलावास स्थगिती दिली होती. कारखान्याची मालमत्ता बँकेकडे गहाणखत असल्यामुळे लिलाव काढला.
लिलावास शेतकऱ्यांच्या वतीने अॅड. हनुमंत जाधव यांनी याचिका दाखल केली होती. लिलाव प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या पैशाला प्रथम प्राधान्य द्यावे, अशी अट असल्यामुळे कारखान्याचा लिलाव होऊन सर्व रक्कम खंडपीठात जमा केली. लिलाव रकमेबाबत वैद्यनाथ, सांगली बँक व शुभ कल्याण ठेवीदार असे सर्वांचे हक्क असल्यामुळे खंडपीठाने शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता त्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. साखर आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार ९६९.०३ लाख रुपये जिल्हाधिकारी उस्मानाबादच्या आदेशानुसार सात दिवसात शेतकऱ्यांना अदा करावे, असे आदेशित केले.
संचालक मंडळावर गुन्हे नोंद करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे आदेशदेवून याचिका निकाली काढल्या. वैद्यनाथ, सांगली बँक, शुभकल्याण ठेवीदारांच्या याचिकांवर ९ जानेवारी २०१९ रोजी सुनावणी ठेवली. शेतकऱ्यांतर्फे अॅड. हनुमंत जाधव, अॅड. शंभुराजे देशमुख, अॅड. कावळेंनी काम पाहिले.

Post a Comment