0

अब्राहम लिंकन यांचे एक प्रसिद्ध वक्तव्य आहे, 'भविष्याचा अंदाज घेण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे ते स्वत: घडवणे.


अब्राहम लिंकन यांचे एक प्रसिद्ध वक्तव्य आहे, 'भविष्याचा अंदाज घेण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे ते स्वत: घडवणे.' मागील वर्षी उद्योग क्षेत्रात प्रचंड उलाढाल झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, बिग डेटा, द इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉक चेन इकॉनॉमी तसेच मोबाइल कॉमर्स क्षेत्र दिवसेंदिवस बहरत आहेत. जनरेशन एक्सचे लोक सध्या जगात निम्म्याहून अधिक ठिकाणी नेतृत्व करतात. यासोबतच तंत्रज्ञानातील नवनवे ट्रेंड्स, सामाजिक सहकार्य आणि आधुनिक कार्यस्थळांवरील वैविध्यामुळे काम करण्याच्या ठिकाणचे वातावरणही बदलत आहे. जनरेशन झेड म्हणजेच नव्या शतकातील तरुणांचे श्रमशक्तीत स्वागत करून अनेक व्यावसायिक संघटना कर्मचाऱ्यांबाबतचे धोरणही बदलत आहेत. जेणेकरून अधिकाधिक तरुण कौशल्य आकर्षित करता येईल, ते टिकवून ठेवता येईल.

दशकभरापासून १४ ते २० टक्के वार्षिक वृद्धी दराने फ्लेक्सी स्टाफिंग म्हणजेच अस्थायी स्वरूपात, लीजवर किंवा करारानुसार कर्मचारी ठेवण्याची लोकप्रियता भारतात वाढली आहे. त्यामुळे तरुण लोकसंख्या व सामाजिक-आर्थिक ताकदींना बळ दिले आहे. दरम्यान, भारतातील नियम-कायद्यांचे प्रमाण कमी होत असले तरी उद्योग, स्टार्टअप, एमएसएमईमध्ये आणखी वाढ करण्याकरिता आपल्याला काही निर्णायक पायाभूत सुधारणा कराव्या लागतील. विशेषत: श्रम, कौशल्य विकास तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात हे बदल अपेक्षित आहेत. तसेच मायक्रोइकॉनॉमिक्स स्तरावरही अनुकूल वातावरण निर्माण करावे लागेल. उद्योगांची उत्पादकता वाढवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील धोरणकर्त्यांना औपचारीकरण, शहरीकरण, औद्योगिकीकरण, वित्तीयीकरण आणि मानवी भांडवलावर करडी नजर ठेवावी लागेल. कारण उत्पादकता वाढल्यानेच नोकऱ्या निर्माण होतील. २०१९ हे वर्ष पुढील शक्तींवर आधारलेले असेल. या शक्ती आपल्या कार्यस्थळांवर सतत प्रभाव पाडत आहेत. कार्यस्थळांचे मूलभूत स्वरूपच बदलत आहे.


मानवी प्रतिभेचे फायदे घेत तंत्रज्ञानाचा वापर : तंत्रज्ञान आणि डेटाद्वारे संचालित संस्कृतीत दुप्पट-चौपट वृद्धी हा सर्व ठिकाणी चर्चेचा विषय आहे. नव्या वर्षात लोगो, प्रक्रिया आणि तंत्रज्ञानातील गुंतवणुकीची योग्य किंमत वसूल करणारे समूहच इतर समान समूहांना मागे टाकतील. तंत्रज्ञान, बिझनेस मॉडेल आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मानवी प्रतिभा यांचे संतुलित मिश्रण करताना व्यावसायिक संघटनांचा संघर्ष नव्या वर्षात दिसून येईल. तंत्रज्ञानाद्वारे उत्पादकता वाढवून परफॉर्मन्स मॅनेजमेंटद्वारे मानवी शक्तींचे आर्थिक मूल्य वाढवण्याचा मार्गही या वर्षी सापडू शकतो.


गिग इकॉनॉमीचा उदय : रोजगार क्षेत्रात सध्या 'पॉवर शिफ्ट' सुरू आहे. कारण नोकरी हवी असलेले लोकच आपली बाजारपेठ नियंत्रित करत आहेत. रोजगाराच्या त्याच त्या पॅटर्नमधून बाहेर पडत हे लोक या क्षेत्रावर स्वत:चा प्रभाव पाडत आहेत. अर्थात भारतात सध्या तरी गिग इकॉनॉमी (अल्पावधी रोजगार किंवा फ्रीलान्स वर्क) अंगवळणी पडलेली नाही. विकसित देशांतील ही कार्यपद्धती नव्या वर्षात हळूहळू वाढताना दिसेल. नव्या तंत्रज्ञानामुळे कामाची पद्धत बदलत असून नव्या नोकऱ्या आणि नव्या भूमिकाही निर्माण होत आहेत. आगामी वर्षात तसेच भविष्यात फ्रीलान्सर आणि दुरून काम करणाऱ्या तज्ज्ञांसाठी करिअरच्या चांगल्या संधी आहेत. अपवर्क तसेच शिफ्ट गिगसारखे डिजिटल स्टाफिंग प्लॅटफॉर्म आणि फ्रीलान्स मार्केटप्लेस भारतात लोकप्रिय होत आहेत. गिगकडे रोजगाराचा पर्याय म्हणूनही पाहता येऊ शकते. पण असंघटित श्रमशक्तीचे महत्त्व कदापि कमी होणार नाही. भारतातील असंघटित श्रमशक्तीचे स्वरूप व प्रमाणदेखील अद्याप पूर्णपणे समोर आलेले नाही.Article about Technology


Post a Comment

 
Top