0
म्हणाले, आठच दिवसांत मारेकऱ्याला ताब्यात घेण्यात यशही आले. मात्र, एमजीएमच्या आकांक्षाचे दु:ख कधीही भरून निघू शकत नाही.

औरंगाबाद- एमजीएम संस्थेच्या गंगा होस्टेलमध्ये १२ डिसेंबरला फिजिओथेरपीच्या पदव्युत्तर पदवीची विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हिचा खून झाला. आठच दिवसांत मारेकऱ्याला ताब्यात घेण्यात यशही आले. मात्र, एमजीएमच्या या विद्यार्थिनीचे दु:ख कधीही भरून निघू शकत नाही. मागील ३६ वर्षांत अशी घटना कधीच घडली नाही. पुढेही अशी घटना कधीच घडू नये यासाठी आकांक्षाचे सतत स्मरण राहावे म्हणून एमजीएमच्या प्रांगणात होणाऱ्या नव्या होस्टेलला आकांक्षा देशमुख असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी केली.

एमजीएमच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'आओ उजाला करे' या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. आकांक्षाला समर्पित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे उपस्थित होते. कदम म्हणाले की, 'सत्य, अहिंसा आणि समता ही त्रिसूत्री महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला दिली. गांधीजींच्या विचारांना तुम्हीही जीवनात उतरवा.' संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आढावा घेतला. 'वृंदगान' कार्यक्रमात गायन, देशभक्तिपर समूहनृत्य झाले. कार्यक्रमाची सांगता 'आओ उजाला करे' हे गीत गाऊन मेणबत्त्या पेटवून झाली. त्यात सारे सहभागी झाले होते.

देशाची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम
या वेळी एमजीएम संस्थेतील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार सांस्कृतिक सादरीकरण केले. आदिवासी तसेच विविध लोककलांचा बहारदार नजराणा सर्वांना अनुभवता आला. वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाने गोंधळाच्या माध्यमातून स्मार्ट सिटी, घनकचरा व्यवस्थापन, महागाई, रस्ते प्रदूषण यावर भाष्य केले. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.
Anaksha Deshmukh name will be given to MGM's new hostel: Kamalkhishor Kadam

Post a Comment

 
Top