सुटीत गावाकडे आलेल्या मंत्रालयातील लिपिकाचा पत्नीबरोबर झालेल्या कौटुंबीक वादानंतर त्याला मारहाण करण्यात आली होती.
- पाटोदा- सुटीत गावाकडे आलेल्या मंत्रालयातील लिपिकाचा पत्नीबरोबर झालेल्या कौटुंबीक वादानंतर त्याला मारहाण करून त्याचे अपहरण केल्याची घटना महासांगवी (ता. पाटोदा) येथे उघडकीस आली. तर दुसरीकडे सुनेने पतीसह सासू सासरे यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार दिल्याने तिघांवर पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.महासांगवी येथील संतोष भगवान थोरे हे मुंबई मंत्रालयात लिपिक म्हणून कार्यरत असून थोरेची सासरवाडी गावातीलच आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता संतोषच्या आई आणि वडिलांचे सुनेसह तिच्या वडिलांबरोबर वाद झाला होता. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता संतोष हा त्याच्या आई वडिलांसह घरी होता. तेंव्हा संदीप जायभाये (रा. तेलंगणी, ता. जामखेड) व अन्य काही व्यक्ती महासांगवीत आले. त्यांनी संतोष यांना घराबाहेर बोलावून शिवीगाळ करत मारहाण केली. तेव्हा संतोषच्या आईवडिलांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही मारहाण केली. यानंतर संतोषला एक पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये टाकून पळवून नेल्याची तक्रार त्यांची आई सुशीला थोरे यांनी पाटोदा ठाण्यात दिली. या प्रकरणी संदीप जायभायेसह अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला.दरम्यान, आई-वडिलांकडे राहायला जा असे म्हणत पती संतोष भगवान थोरे, सासरे भगवान थोरे व सासू सुशीला भगवान थोरे यांनी मारहाण केली असून मध्यस्थीसाठी आलेल्या नातेवाइकाच्याही डोक्यात वीट मारून जखमी केल्याची तक्रार संतोषची पत्नी मयुरी थोरे हिने पाटोदा पोलिस ठाण्यात दिली. त्यामुळे संतोषसह त्याच्या आई - वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला.
Post a Comment