0
इस्लामाबाद- भारतातील सत्ताधारी भाजप सरकार मुस्लिमविरोधी व पाकिस्तानविरोधी आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे भारताचा पाकिस्तानविरोधी रोख दिसू लागला आहे, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.

इम्रान खान यांनी गुरुवारी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत उभय देशांत नव्याने चर्चेस सुरुवात होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तानच्या मुस्लिमांचा प्रत्येक भारतीय माणूस तिरस्कार करतो. कारण धर्माच्या नावाखाली भारतातून पाकिस्तानात जाणे त्यांनी स्वीकारले होते. इम्रान म्हणाले, आम्ही भारतीय शीख भाविकांसाठी कर्तारपूर साहिब गुरुद्वारासाठी व्हिसामुक्त तीर्थयात्रेची सुविधा सुरू केली व कर्तारपूर सीमाही सुरू केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबाबत काही तरी करण्याची इच्छा आहे. कारण ते दहशतवादी कृत्य होते. दहशतवादाच्या विरोधात कारवाई करणे आमच्या हिताचे आहे, असे इम्रान यांनी सांगितले.

माजी मुत्सद्दी म्हणाले - तालिबान चर्चेच्या नावाखाली अमेरिकेची करेल फसवणूक
अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी वरिष्ठ मुत्सद्दी हुसैन हक्कानी म्हणाले, अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याची घाई करू नये. अफगाणिस्तान सोडण्यासाठी तालिबानशी चर्चा करणेही योग्य नाही. कारण तालिबान चर्चेच्या बहाण्याने अमेरिकेची फसवणूक करू शकतो. ही संघटना अमेरिकेच्या सैन्याला कायमचेच अफगाणिस्तानच्या बाहेर काढू शकते.


त्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचे अड्डा बनू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून सहकार्य करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भातील प्रश्नावर हक्कानी यांनी देशाची भूमिका मंडण्याचा प्रयत्न केला.

इम्रानने चार वेळा भारतातील निवडणुकीस पाकशी जोडले
पाकिस्तानात पीटीआय सरकारला १०८ दिवस पूर्ण झाले आहेत. इम्रान खानने १८ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले होते. त्यात दोन्ही देशांमधील थांबलेली शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावर भारताने पाकिस्तानला उत्तर पाठवले होते. सीमेवर दहशतवादी हल्ले केले जात आहेत. अशा वातावरणात चर्चा केली जाऊ शकत नाही, असे भारताने स्पष्ट शब्दांत कळवले होते. त्यामुळे चर्चेचा प्रस्ताव भारताने फेटाळला होता. पाकिस्तान २०१९ च्या निवडणुकीनंतर भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे करेल. २८ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानात करतारपूर मार्गिकेच्या कोनशिला समारंभात इम्रान म्हणाले होते की, नवज्योत सिंग सिद्धू भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध दृढ करण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका निभावतील. पण मग सिद्धू यांनी पंतप्रधान होण्याची प्रतीक्षा करायला हवी का ? भारताशी चर्चा करण्यासाठी निवडणुकीपर्यंत प्रतीक्षा केली जाईल, असे त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हटले होते. इम्रान यांनी आतापर्यंत निवडणुकीचा मुद्दा चार वेळा उपस्थित केला आहे.Prime Minister Imran Khan- India's ruling BJP is anti-Muslim and anti-Pakistan

Post a Comment

 
Top