हालाखीच्या परिस्थितीमुळे तिला कर्ज चुकविता आले नाही. मात्र मध्यस्थी महिलेने पीडितेला देहविक्री करण्यास भाग पाडले.
नागपूर- पतीच्या आजारपणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पत्नीला देहविक्री करण्याची वेळ आली. तसेच घरभाडे न दिल्याने पीडितेवर घरमालकानेही बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उपराजधानी नागपुरात घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला आणि तिचा पती हा मध्य प्रदेशातील आहे. हे दाम्पत्य कामाच्या शोधात नागपुरात आले होते. नागपुरात पीडित महिला पतीसोबत भाड्याच्या घरात राहात होती. दरम्यान तिच्या पतीची तब्येत बिघडली. त्याच्या उपचारासाठी तिने एका महिलेल्या माध्यमातून एका व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. परंतु हालाखीच्या परिस्थितीमुळे तिला कर्ज चुकविता आले नाही. मात्र मध्यस्थी महिलेने पीडितेला देहविक्री करण्यास भाग पाडले. दुसरीकडे घरमालकाने भाड्याच्या पैशांसाठी तगादा लावत पीडितेवर बलात्कार केला. आर्थिक परिस्थितीमुळे पीडितेला दोनदा अत्याचार सहन करावा लागला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस मध्यस्थी महिलेचा शोध घेत आहेत.

Post a Comment