0
पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फर्दापूर - जंगला तांडा (ता.सोयगाव) येथील सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या तेरावर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या पन्नासवर्षीय व्यक्तीने भावास व तुला जिवे मारीन अशी धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. दरम्यान, मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली. गोवर-रुबेलाची लस घेण्यासाठी गेली असता डाॅक्टराच्या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याची कळाल्याने तिच्या आजीला ही माहिती दिली. ही वार्ता कळताच बदनामीच्या भीतीने आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलीचे आई-वडील मजुरीनिमित्त गावाबाहेर राहतात. सहा महिन्यांपासून सुरेश चव्हाण(५०) हा तिला धमकावून अत्याचार करीत होता. यातूनच ती गर्भवती राहिली होती.Rape accused's suicide in soigaon

Post a Comment

 
Top