'सिंबा'च्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचली अमृता सिंह...
मुंबई. 28 डिसेंबरला रणवीर सिंह आणि सारा अली खानचा 'सिंबा' सिनेमा रिलीज होत आहे. रिलिजीच्या 3 दिवसांपुर्वीच सिंबाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले. पतीचा सिनेमा पाहण्यासाठी दीपिका पदुकोण आपली सासू अंजू भवनानी आणि सासरे जगजीत सिंह भवनानीसोबत एकाच कारमध्ये पोहोचली. समोर आलेल्या फोटोजमध्ये सासरे जगजीत कार चालवत होते आणि सासू अंजू बाजूला बसेल्या होती. तर मागे दीपिका आपली नणंद रितिका भवनानीसोबत बसलेली होती. कारमध्ये रणवीर दिसला नाही. तो एकटाच आपल्या चित्रपटाची स्क्रीनिंग अटेंड करण्यासाठी पोहोचला होता.
'सिंबा'च्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचली अमृता सिंह...
- लेक सारा अली खानला सपोर्ट करण्यासाठी आणि तिचा चित्रपट पाहण्यासाठी अमृता सिंहही 'सिंबा'च्या स्क्रीनिंगमध्ये पोहोचली होती.
- अमृताचा मुलगा इब्राहिम अली खानही सोबत होता. स्क्रीनिंगमध्ये अमृता मुलगा आणि मुलीसोबत पोज देताना दिसल्या.
- साराचा चित्रपट पाहण्यासाठी पापा सैफ अली खान पोहोचले नव्हते.
- सैफ हा पत्नी करीना आणि मुलगा तैमूरसोबत लंडनमध्ये हॉलिडेवर गेला आहे. यामुळेच तो स्क्रीनिंगमध्ये येऊ शकला नाही. 'सिंबा'च्या स्क्रीनिंगमध्ये सोनू सूद, रोहित शेट्टी, करण जोहरही पोहोचले.

Post a Comment