0

अलास्काच्या अल्युशियन द्वीप समुहावरील शेम्या द्वीपवर असलेल्या अमेरिकी सैन्याच्या अड्ड्यावर केले आपत्कालीन लँडिंग.


  • न्युयॉर्क- समुद्राच्या मधोमध पायलटच्या सतर्कतेमुळे विमानाची मोठी दुर्घटना टळली. डेल्टा एयरलाइन्सचे विमान बेइजिंगवरुन सिएटलच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ही बाब पायलटच्या लक्षात येताच त्याने तातडीने अमेरिकी द्वीप अलास्कावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. पायलटच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचल्याने प्रवाशांकडून पायलटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
    विमानाची आपत्कालीन लँडिंग
    सुत्रांनी सांगितल्यानुसार, सोमवारी बेइजिंगवरुन सिएटलकडे प्रवास करणाऱ्या डेल्टा एयर लाइन्सच्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमान पायलटने आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने अलास्काच्या अल्युशियन द्वीप समुहावरील शेम्या द्वीपवर असलेल्या अमेरिकी सैन्याच्या अड्ड्यावर आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी मागीतली. सैन्याकडून परवानगी मिळताच पायलटने तातडीने आपत्कालीन लँडिंग केली. या विमानात जवळपास 194 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
    डेल्टा एयरलाइन्सचे अधिकारी ड्रेक कॅस्टनेडा यांनी मागितली प्रवाशांची माफी
    डेल्टा फ्लाइटचे अधिकारी ड्रेक कॅस्टनेडा यांनी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची माफी मागितली. तसेच विमानाच्या इंजिनात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांनी प्रवाशांकडे दिलगीरी व्यक्त केली.Delta Airline's Flight makes emergency landing

Post a comment

 
Top