डेवी Lesch Nyhan Syndrome आजाराने ग्रस्त आहे. तो स्वतःला चावा घेऊन जखमी करत असतो.
वॉशिंग्टन - जगात अनेकप्रकारचे आजार आहेत. त्यापैकी काही आजार एवढे विचित्र आहेत की, त्याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. अशाच एका आजाराबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. त्याला एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे तो कधी कधी नरभक्षक बनतो. अनेकदा तर तो स्वतःच्या शरिराचे लचके तोडून मांस खातो.
स्वतःला जखमी करतो
- हे प्रकरण अमेरिकेच्या वॉशिंग्टनचे आहे. 11 वर्षांची डेवी त्याच्या आई वडिलांबरोबर राहतो. त्याला एक असा आजार आहे, ज्यामुळे तो स्वतःला विचित्र प्रकारे जखमी करून घेतो. त्याच्याजळ कोणी बसले असेल तर तो त्यालाही चावलो. हा आजार 3.80 लाख लोकांमधून एखाद्यालाच असतो.
- डेवी Lesch Nyhan Syndrome आजाराने ग्रस्त आहे. तो स्वतःला चावा घेऊन जखमी करत असतो. डेवी एका वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या पॅरेंट्सना या आजाराबाबत समजले.
- स्वतःला चावा घेऊ नये म्हणून त्याचे आईवडील त्याच्या हातांना ब्रेसेस बांधतात. त्यामुळे त्याचे हात तोंडापर्यंत जात नाही. सारख्या आजारपणामुळे तो अशक्तही बनला आहे. त्यामुळे त्याला ग्रॅस्ट्रो इंटस्टेनियल ट्यूबद्वारे आहार देतात. तो थेट त्याच्या पोटात जातो.
- आई वजिलांसह डेवीची केअरटेकरही 27×7 त्याच्या बरोबर राहते. मुलाला इतर मुलांप्रमाणेच वागणूक केण्यासाठी आई वडील त्याला शाळेतही पाठवतात. मुलगा किती दिवस असेल माहिती नाही, त्यामुळे त्याला संपूर्ण आनंद देण्याचा प्रयत्न असल्याचे त्याची आई म्हणाली.

Post a Comment