निरर्थक सामाजिक धारणांच्या बेड्यांनी घेतला बीड जिल्ह्यातील विवाहित महिलेचा बळी
बीड- वंशाला दिवा पाहिजे या मानसिकतेतून सात मुली आणि दाेन गर्भपातांनंतरही बाळंतपणाला सामोरे जाणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला अती रक्तस्रावामुळे आपले प्राण गमवावे लागले. दहाव्यांदा झालेल्या गर्भधारणेत मुलाचा गर्भ राहिला खरा; पण जन्मण्यापूर्वीच तो आईबरोबरच गतप्राण झाला. हजारो मुलींचे कर्तृत्व समोर असतानाही कथित सामाजिक प्रतिष्ठेच्या बेड्यांमध्ये अडकलेली मानसिकता अजूनही महिलांना केवळ पुनरुत्पत्तीचेच यंत्र मानते, हे या घटनेने अधोरेखित केले आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगावची मीरा रामेश्वर एखंडे या महिलेला प्रसूतीकळा येऊ लागल्याने २८ डिसेंबरला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजता तिला प्रसूतीसाठी टेबलवर घेण्यात आले. मात्र, अचानक मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. तो थांबवण्यासाठी डाॅक्टरांचे प्रयत्न सुरू झाले. रक्तपुरवठा सुरू करण्यात आला. स्थानिक स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, तीन तासांत तिचा मृत्यू झाला. तिच्या बाळाचाही पोटातच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले. या महिलेचा पती माजलगाव येथे पानाची टपरी चालवतो. त्याला आणखी दोन भाऊ असून एकाला दोन तर एकाला एक मुलगा आहे.
आपल्यालाही मुलगा असावा, अशी या दाम्पत्याची इच्छा होती आणि त्यासाठी मीरा एखंडे दहाव्यांदा गर्भार राहिली होती. या दाम्पत्याला आठ मुली झाल्या. त्यापैकी एक काही वर्षांपूर्वी वारली. एकदा गर्भपात झाला होता.त्यामुळे आता बाळंतपण झेपणार नाही आणि जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून हे बाळंतपण टाळावे, असा सल्ला स्त्रीरोगतज्ञांनी दिला होता. पण मुलगा हवाच या हट्टापायी हा सल्ला त्यांनी फेटाळून लावला आणि वयाच्या ३५ वर्षी या महिलेला हे जग सोडावे लागले. या दाम्पत्याची मोठी मुलगी सध्या १२ व्या इयत्तेत शिकते आहे. त्यानुसार तिचे वय किमान १७ वर्षांचे असावे. त्यापूर्वी एक वर्ष आधी म्हणजे १८ वर्षांपूर्वी लग्न झाले असेल तर या महिलेचे वय त्यावेळी अवघे १७ वर्षांचे असावे. त्या नंतर लगेचच सुरू झालेल्या बाळंतपणांच्या मालिकेचे पर्यावसन अखेर तिच्या मृत्यूत झाले आहे. शनिवारी सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
एकीकडे प्रगत तंत्रज्ञान आणि दुसरीकडे माता मृत्यूदरात वाढ असा विरोधाभास आज दिसतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे मुलीच्या आरोग्याकडे केले जाणारे दुर्लक्ष होय. मुलींच्या बालपणापासून त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या अॅनिमिक होतात. त्यांच्यात पुरेशी प्रतिकार क्षमता विकसित होऊ शकत नाही. परिणामी बाळंतपण त्या पेलू शकत नाहीत. नोकरी करणाऱ्या महिलांना कुटूंब आणि नोकरी व्यवसायाचे ठिकाण अशा दुहेरी ताणाला सामोरे जावे लागते. या सर्व ओढाताणीमुळे हार्मोनलचे असंतुलन निर्माण होते. याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो. त्यामुळेही प्रसूतीदरम्यानं माता मृत्यूचं प्रमाण वाढले आहे, असे डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले.
मुलाच्या अाशेपाेटी मीराला ७ मुली हाेतात. दाेन वेळा गर्भपात केले जातात तरीही ती दहाव्यांदा गराेदर राहते. अखेरीस रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला तिचा व तिच्या बाळाचा (जाे मुलगा हाेता) मृतदेह पाहणेच नशिबी येते. माजलगावातील या घटनेने सर्वांना सुन्न केले अाहे. अापण काेणत्या युगात जगत अाहाेत, असा प्रश्न त्यामुळे ठळक केला अाहे.
बंद दरवाजांचा मराठवाडा!
मराठवाड्याच्या बीड, हिंगोली, परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये आजही मुलगी नकोच अशी मानसिकता आहे. त्यामुळेच बीडसारख्या ठिकाणी शेकडो स्त्री भ्रूणहत्या घडवून आणणाऱ्या सुदाम मुंडेसारखे नराधम नको ते धंदे करू शकले. आज मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे प्रमाण विदर्भात १५ ते १८ टक्के इतके आहे. मात्र हेच प्रमाण मराठवाड्यात जेमतेम ५ टक्के आहे. मराठवाड्याचे दरवाजे असे बंदिस्त का, असा प्रश्न पडतो. या क्षेत्रात आणखी खूप मोठ्या प्रमाणावर सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. - डॉ.आशा मिरगे, स्त्रीरोगतज्ज्ञ, माजी सदस्या, महिला आयोग

Post a Comment