अफगाणच्या शांततेसाठी संयुक्त धाेरण राबवणार
बीजिंग- अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांनी गत अाठवड्यात अफगाणिस्तानसह युद्धग्रस्त तालिबान्यांच्या प्रदेशातून सैन्यसंख्या कमी करण्याची घाेषणा केली. त्यांच्या या निर्णयावर अमेरिकेसह इतर देशांकडून टीका हाेत अाहे, तर काही देशांनी यास याेग्य पाऊल असल्याचे ठरवले अाहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान व चीनमध्ये नुकतीच चर्चा झाली.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी मंगळवारी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेऊन अफगाणसह तालिबानमधील सद्य:स्थितीवर चर्चा केली. अफगाणिस्तानमधून सुमारे ७,००० सैनिक कमी करण्याच्या व युद्धग्रस्त देशात तालिबानच्या पुनरुत्थानाच्या अमेरिकेच्या निर्णयावर निर्माण झालेल्या स्थितीवर दाेन्ही देशांत चर्चा झाली. अमेरिकेच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कुरेशी यांनी चार देशांचा तीनदिवसीय दौरा केला. त्यात सोमवारी अफगाणिस्तान व इराणचा दाैरा केल्यानंतर मंगळवारी सकाळी ते बीजिंगला पाेहाेचले.
पत्रकारांना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले की, कुरेशींनी चीनचे स्टेट काैन्सेलर व परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेऊन अफगाणिस्तानमधील स्थितीसह क्षेत्रीय शांतता व स्थैर्यावर सविस्तर चर्चा केली. तसेच यासाठी एक संयुक्त कृती धाेरण स्वीकारून दाेन्ही देशांतील संबंध दृढ करण्यासाेबत अफगाणच्या नेतृत्वातील शांतता प्रक्रियेसाठी काम करण्याच्या दृढ संकल्पाचा पुनरुच्चार केला. दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानमधील सहकारी, राजनयिक अधिकाऱ्यांसह इतरांनी नाराजी व्यक्त केली अाहे. गत १७ वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध संपवून तालिबानशी शांतता व विकासाबाबत नव्याने चर्चा करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
राजकीय सामंजस्य हीच व्यवहार्य पद्धत
अफगाणमधील समस्येवर लष्कर हे उत्तर नसल्याचे सांगून याबाबत राजकीय सामंजस्यच एकमेव व्यवहार्य पद्धत अाहे. अफगाणमधील नागरिकांनाही विकास व शांततेचा अानंद घेण्याचा अधिकार अाहे. यासाठी चीनकडून सहकार्य केले जाईल. त्यामुळे अमेरिकेने अापल्या निर्णयावर तत्काळ अंमलबजावणी करावी, असे मत चीनने व्यक्त केले अाहे. यासह पाक व अफगाणमध्ये सामंजस्य प्रस्थापित हाेण्यासाठी चीनकडून त्रिपक्षीय चर्चा केली गेली. दोन्ही देश परस्पर भागीदारी पुढे नेण्यासह सहकार्य वाढवण्यावर भर देणार अाहेत, असेही हुअा यांनी सांगितले.
अमेरिकेच्या सैन्य कपातीच्या निर्णयाचे तालिबानकडून स्वागत
अफगाणिस्तानमधील सैन्याची संख्या कमी करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे तालिबानने स्वागत केले अाहे. या निर्णयामुळे दाेन्ही देशांतील संघर्षाची स्थिती संपेल व विकासासह शांततेचे एक नवे पर्व सुरू हाेईल, असा अाशावादही त्यांनी व्यक्त केला अाहे. दरम्यान, तालिबानला कथितरीत्या पाठिंबा देण्यामुळे अमेरिका व अफगाणिस्तान पाकवर तीव्र नाराजी व्यक्त करत अाहे. पाकच्या या कृत्यामुळे अनेक तालिबानी पाकमध्ये घुसखाेरी करत असतात.

Post a Comment