पिंपरीतील जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरात बुधवारी (ता.26) ही घटना समोर आली आहे स्थानिक नागरिकांन नवजात शिशु रडण्याचा आवाज येत होता. आवाजाच्या दिशेने त्यांनी जाऊन पाहिले असता झुडपात एक दिवसाचे बाळ रडताना त्यांना दिसले. याबाबत वाकड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला ताब्यात घेतले आहे. तिला उपचारासाठी औंध शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Post a Comment