0
अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले.

नगर- अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याने गुरुवारी तौसिफ हासिम शेख (२७) याने अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून दिले. यात तो ८०% भाजला आहे. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तौसिफने आधी २४ सप्टेंबर, १० डिसेंबर आणि २० डिसेंबरला आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा १५ डिसेंबरला दिला होता.

अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याने गुरुवारी कर्जतच्या तौसिफ हासिम शेख (२७) या युवकाने अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून दिले. यात तो ८० टक्के भाजला आहे. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी तौसिफ ३ महिन्यांपासून पाठपुरावा करत होता. त्याने यापूर्वी दोनवेळ आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु, एकदा अतिक्रमण काढण्याचे आश्वासन मिळाल्याने आणि दुसऱ्यांदा मनपा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ते टाळले. तरीसुद्धा प्रशासनाकडून काहीच हालचाली न झाल्याने त्याने निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० डिसेंबरला आत्मदहनाचा इशारा दिला. गुरूवारी दुपारी ३.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्याने अंगावर इंधन ओतून पेटवून घेतले.नागरिकांनी अथक प्रयत्नानंतर आग विझवून नगरच्या जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने सायंकाळी ६.१५ वाजता त्याला पुण्याला पाठवण्यात आले.

पालकमंत्र्यांना माहिती देऊनही दुर्लक्ष
पालकमंत्र्यांना याप्रकरणी माहिती दिली होती. तरीसुद्धा त्यांनी विशेष लक्ष न देता टाळण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली. दोषींवर योग्य ती कारवाई करा, अशी मागणी तौसिफचा भाऊ इम्रान शेखने केली आहे. दरम्यान, तौसिफने २० ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी अतिक्रमण काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानंतर दोनवेळा त्याने इशारा दिला होता तरीसुद्धा आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने त्याने आत्मदहनाचा पवित्रा घेतला असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.

दोन चिमुरड्या मुली अन् आर्थिक स्थिती बेताची...
तौसिफ शेख हा सामाजिक कार्यकर्ता आहे. तो अनाथ विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असतो. त्याचा लहान भाऊदेखील सध्या आजारी आहेत. शिवाय, घरची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. तौसिफचे लग्न झाले असून त्याला दोन मुली आहेत. एक मुलगी ३ वर्षांची, तर दुसरी दीड वर्षाची आहे.

ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढणार
संबंधित व्यक्तीचा जीव वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील उपचारांसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. त्यांच्या मागणीबाबत प्रशासन सकारात्मक आहे. कर्जत येथील ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत.'' राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी.
Youth attemt Suicide in Nagar

Post a Comment

 
Top