0
या गावातील लोक एका विधवेच्या भुताला घाबरतात, त्यामुळे त्यांनी महिलांचे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी आलेला 'स्त्री' चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. मूळ हॉरर असलेल्या या चित्रपटाची कथा काहीशी गमतीशीरही होती. या गावात एक चेटकीन असते आणि ती पुरुषांना मारते म्हणून गावातील सगळे पुरुष साड्या नेसत असतात. तसेच दाराबाहेर लिहिले असते 'ओ स्त्री कल आना?' पण प्रत्यक्षात असे घडू शकते का, तर या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. कारण थायलंडमध्ये खरंच एक असे गाव आहे. याबाबतची बातमी सध्या व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकार..
>> जगात एक असे गावही आहे, जेथे सर्व पुरुष पूर्णपणे महिलांचेच कपडे परिधान करतात हे गाव आहे, थायलंडच्या फेनम प्रांतात.
>> या गावातील सर्व पुरुष महिलांचे कपडे परिधान करतात. त्यामागे एक अत्यंत विचित्र कारण सांगितले जात आहे.
>> या गावातील लोक एका विधवेच्या भुताला घाबरतात, त्यामुळे त्यांनी महिलांचे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आहे.
>> या गावात 5 जणांचा झोपेतच मृत्यू झाला होता. त्यानंतर भीती पसरली आणि लोक महिलांचे कपडे परिधान करू लागले असे सांगण्यात येत आहे.
>> गावातील लोकांचे असे म्हणणे आहे की, ही चेटकीन पुरुष आणि तरुणांना शिकार बनवते. त्यामुळे घरातील पुरुषांना महिलांचे लाल कपडे परिधान करायला लावले जाते.
>> घरासमोर लोकांनी येथे कोणीही पुरुष राहत नाही, असे बोर्डही लावलेले आहेत.

Post a Comment

 
Top