0

नाकात असे काही असेल याचा विचारही कुणी केला नव्हता

  • व्हिडिओ डेस्क. इंटरनेटवर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक वेळा चकीत करणारे व्हिडिओ नजरेस पडतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका मुलीच्या नाकातून एक विचित्र जीव काढला जातोय. तिच्या नाकात एक दुर्मिळ वार्म आहे असे बोलले जातेय. लोकांनी व्हिडिओवर कमेंट करुन सांगितले की, हे हैमरहेड वार्म आहे. व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, वेदना झाल्यानंतर मुलीला रुग्णालयात आणण्यात आले. नंतर डॉक्टरांनी चेकअप केले. व्हिडिओमध्ये दाखवले की, डॉक्टरांनी मुलीच्या नाकात टॉर्च लावून पाहिले तर त्यांना थोडी हालचाल जाणवली. हा व्हिडिओ चीनमधील असल्याचे बोलले जातेय. त्यांनी लक्षपुर्वक पाहिल्यानंतर त्यांना मधे काही तरी असल्याचे जाणवले. त्यांनी ते काढल्यानंतर सर्वच चकीत झाले. व्हिडिओमध्ये एका महिलेचा आवाज ऐकायला येतोय, यावरुन वाटते की, तिच्या नाकातील जीव काढल्यानंतर ती महिला घाबरली आहे.

Post a comment

 
Top