0
काही दिवसांपासून पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत प्रियांका गांधी सहभागी झाल्याचं दिसत आहे.

: सोनिया गांधी यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या सक्रिय राजकारणात प्रवेश करणार का, याबाबतच्या चर्चांनी आत वेग पकडला आहे. प्रियांका गांधी या मध्य प्रदेशचे आगामी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठीही उपस्थित राहणार आहेत.

अलिकडच्या काही दिवसांपासून पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत प्रियांका गांधी सहभागी झाल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाचा पेच तयार झाला होता. कारण सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात प्रचंड स्पर्धा होती. तेव्हाही यातून मार्ग काढण्यासाठी प्रियांका या भाऊ राहुल गांधी यांच्या मदतीला धावल्या होत्या.

अशातच प्रियांका गांधी या कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यालाही जात आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रियांका काँग्रेसकडून राजकारणात सक्रिय झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. दरम्यान, या कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला प्रियांका यांच्यासह राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.

प्रियांका गांधी आणि राजकारण

प्रियांका यांनी निवडणूक लढवलेली नसली तरीही त्या याआधीही अनेकदा राजकीय मंचावर दिसल्या आहेत. राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ अमेठी आणि सोनिया गांधी जिथून निवडून येतात त्या रायबरेली या मतदारसंघात प्रियांका नियमितपणे अनेक कार्यक्रमांना हजेर लावत असतात.राहुलसोबत आता प्रियांकाही राजकारणाच्या मैदानात? चर्चांना उधाण

Post a comment

 
Top