0
जळगाव- सिंधी कॉलनी परिसरातील गणेशनगरात असलेल्या निलेश अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील घरात घुसून चार दरोडेखोरांनी दाम्पत्यास चाकुचा धाक दाखवून लोखोंचा ऐवज घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दरोडे खोरांनी दाम्पत्याला मुलास पळवून नेण्याची धमकी देत दोघांच्या अंगावरील तसेच कपाटात ठेवलेले २ लाख ५६ हजार ९०० रूपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. या दरोडे खोरांनी याच परिसरातील आणखी दोन अपार्टमेंटमधील तीन घरे फोडली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून दाम्पत्याने पोलिसात याविरोधी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

चाकुचा धाक दाखवून लुटला लाखोंचा ऐवज
> रितेश जवाहरलाल कटारीया यांच्या घरात हा दरोडा पडला आहे. आठ दिवसांपूर्वीच कटारीया कुटुंब या अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी आले होते. शेजारी राहणाऱ्या साई अपार्टमेंटमध्ये ते सुरूवातील राहत होते. दरम्यान, रेडीमेड कपड्याचे व्यापारी असलेले रितेश कटारीया हे सोमवारी रात्री १२ वाजता पत्नी साक्षी व पाच वर्षांचा मुलगा पियुष याच्यासह घरात झोपले होते. पहाटे चार वाजता दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजास जोरदार धक्का देऊन उघडला. कडी-कोयंडा दोन बरीक स्क्रुवर असल्यामुळे एकाच धक्क्यात दरवाजा उघडला. या आवाजाने कटारीया जागे झाले होते. घरात अंधार असल्यामुळे एका दरोडेखोराने बॅटरीचा प्रकाश कटारीयांच्या चेहऱ्यावर मारला. यांनतर दुसऱ्या दरोडेखोराने चाकुचा धाक दाखवत बेडरुमकडे चाल केली.

> चार पैकी तीन दरोडेखोरांच्या हातात चाकु तर एकाच्या हातात बॅटरी होती. चौघांनी बेडरुमध्ये येऊन कटारीया दाम्पत्यास धमकावले. ‘सब माल हमे दे दो, आवाज किया तो डाल देंगे, किसीको फोन किया तो बच्चे को भी उठा ले जायेंगे’अशी धमकी देत दरोडेखोरांनी कपाटाची चावी मागीतली. चावी सोबत नसल्याचे कटारीया यांनी सांगताच एका दरोडेखोराने स्क्रु ड्रायव्हरच्या मदतीने कपाट उघडले. यानंतर कपाटात ठेवलेले दागिने, कटारीया दांम्पत्याच्या अंगावरील दागिने व मोबाईल असा एकुण 6 लाख 56 हजार 900 रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी लांबवला. सुमारे अर्धा तास दरोडेखोरांनी कटारीया यांच्या घरात थांबून ऐवज लुटला.

> दाम्पत्याने पोलिस स्टेशनमध्ये या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
Robbery in Jalgaon, crackdown 2 lakhs rupees were looted...

Post a Comment

 
Top