0
 • school students kidnapping friend for see the movieअंबाजोगाई - मराठी सिनेमा पाहण्यासाठी अंबाजाेगाईतील तीन मित्रांनी अगदी सिनेस्टाइलने सातवीत शिकणाऱ्या मित्राचे दुचाकीवरून शाळेसमोरून अपहरण केले. मुलाच्या अपहरणाच्या बातमीने शाळेचे मुख्याध्यापक, पालक व पाेलिसांची धावपळ सुरू झाली अन् लातूरजवळील रेणापूर फाट्यावर पाेलिसांनी नाकेबंदी केली. दरम्यान, चार किलाेमीटरचा पाठलाग करत दाेन दुचाकींवरून सुसाट जाणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चित्रपट पाहण्यासाठी अपहरणाचा बनाव केल्याचे चारही जणांनी कबूल केले अन्् साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास साेडला.
  साेमवारी घडलेल्या या घटनेने पालक अाणि पाल्यांमधली 'नाळ' कशी तुटत चालली अाहे हेच अधाेरेखित हाेते. विशेष म्हणजे ज्या मुलाच्या अपहरणाचा हा बनाव करण्यात अाला त्याने मित्रांच्या मदतीने यापूर्वीही दाेन वेळा असाच बनाव रचला हाेता, अशी माहिती अाहे.
  प्लॅनिंग करून केले शाळेसमोरून अपहरण 
  पाेखरी रस्त्यावरील शाळेत रूपेश (बदललेले नाव) सातवीत शिकत आहे. त्याला 'नाळ' चित्रपट पाहायचा हाेता. यासाठी त्याच्या मित्रांनी त्याच्या मदतीने त्याच्याच अपहरणाचा बनाव रचला. रूपेश साेमवारी सकाळी सात वाजता रिक्षाने शाळेत पाेहोचला. रूपेशने शाळा परिसरात अापले दप्तर ठेवले व शाळेबाहेर अाला. ठरल्याप्रमाणे दुचाकीवरून अालेल्या त्याच्या तीन मित्रांनी ताेंड दाबून त्याचे अपहरण केल्याचा बनाव केला.

  या अपहरण नाट्यामुळे शहरातील पालक अस्वस्थ झाले होते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे. सोमनाथ गित्ते, पोलिस निरीक्षक, अंबाजाेगाई.
  पालकांनी विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवावे 
  नाकेबंदीत सापडली अन‌् उघड झाला बनाव 

  घटनेनंतर पाेलिस निरीक्षक साेमनाथ गित्ते यांनी लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी येथील पाेलिसांना अपहरणाची माहिती देत नाकेबंदी केली. पोलिस जमादार विठ्ठल कोंडगीर व रूपेशचे मामा त्याच्या शाेधात निघाले हाेते. रेणापूर फाट्यावर एक दुचाकी व स्कूटीवरून मुले भरधाव वेगात लातूरकडे जाताना दिसली. या दाेघांनी मुलांचा पाठलाग केला व त्यांना ताब्यात घेतले. यानंतर अपहरण नाट्याचा उलगडा झाला.
  रिक्षाचालकाला धमकी 
  रूपेशच्या काही मित्रांनी ताे ज्या रिक्षाने शाळेत जाताे त्या रिक्षाचालकालाही धमकावले हाेते. रूपेशला अाम्ही गाडीवर शाळेत साेडू. तू त्याची रिक्षा बंद कर, अन्यथा अाम्ही तुझी रिक्षा बंद करू, अशी धमकी रिक्षाचालकाला देण्यात अाली हाेती. याची नाेंदही संबंधित रिक्षाचालकाने शाळेच्या रजिस्टरवर केली अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.

Post a Comment

 
Top