0
आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचाही गुन्हा दाखल.

  • धारणी- भररस्त्यावर आदिवासी महिलेचे बळजबरीने चुंबन घेऊन घटनेचे चित्रिकरण व्हायरल केल्याच्या घटनेने धारणी येथे तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी आरोपी मो. वसीम मो. आरिफ सौदागर (वय ३०, रा. धारणी)याच्यासह चित्रिकरण करणाऱ्या अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून पोलिस बंदोबस्त लावण्यात आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून, आरोपीवर आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचाही गुन्हा दाखल आहे.
    पीडित ४५ वर्षीय महिला धुणीभांडीचे कामे करते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काम आटोपून मो. वसीम मो. आरिफ सौदागर याच्या हार्डवेअरच्या दुकानासमोर उभी होती. दरम्यान, वसीम सौदागरने पीडितेला आवाज देऊन दुकानात बोलावले. पीडित महिला दुकानात आल्यावर तिला बसायला सांगितले. पीडित महिला दुकानात येऊन बसल्यावर वसीमने तिच्याशी अश्लील संवाद साधला. दरम्यान, महिलेने संताप व्यक्त केला. वसीमने बळजबरीने चुंबन घेतले व अश्लील चाळे केले. यावेळी वसीमच्या अल्पवयीन मित्राने या घटनेचे मोबाइलने चित्रिकरण करून व्हायरल केले. दरम्यान या घटनेची माहिती शहरात पसरताच दोन गटातमध्ये तणाव निर्माण झाला. परंतु पोलिस प्रशासनाने त्वरित बंदोबस्त केल्याने तणाव निवळला. रात्रभर शहरात तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान, याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मो. वसीम मो आरिफ सौदागर यांच्यासह अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अमरावती येथून विशेष दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले असून, शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मो. वसीम मो. आरिफ सौदागर याला आज अचलपूरच्या सेशन कोर्टापुढे हजर केले असून, अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीशांनी त्यास न्यायालयीन कोठडी तर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
    मो. वसीम सामूहिक अत्याचारातील आरोपी
    मो. वसीम सराईत गुन्हेगार असून २०१५ मध्ये आदिवासी मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असून, सध्या तो जामीनावर मुक्त असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
    Women abuse in Dharni, Amravati

Post a Comment

 
Top