0
'मी माझे सर्वस्व त्याला दिला आणि मोबदल्यात मला काय मिळाले'- नेहा



  • एंटरटेन्मेंट डेस्कः गायिका नेहा कक्कडचे बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले आहे. याची माहिती स्वतः नेहाने इंस्टाग्रामवरुन दिली होती. पण त्यावेळी तिने ब्रेकअपमागचे कारण उघड केले नव्हते. पण आता यामागचे कारण समोर आले आहे. रिपोर्टनुसार, केवळ संशयामुळे दोघे वेगळे झाले आहेत. या दोघांमध्ये भांडणाचे कारण इंडियन आयडॉलमधील एक स्पर्धक ठरला. या स्पर्धकावरुन हिमांश कायम नेहावर संशय घेऊ लागला होता, त्यामुळे नेहा त्रस्त झाली होती. आता हिमांशपासून वेगळे झाल्यानंतर नेहा आयुष्यात पुढे जात आहे.

    एकमेकांना केले सोशल मीडियावर अनफॉलो....
    - ब्रेकअपनंतर हिमांश आणि नेहा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. इतकेच नाही तर नेहाने हिमांशसोबतचे रोमँटिक फोटोजही इंस्टाग्रामवरुन डिलीट केले आहेत.
    - रिलेशनशिप संपल्यानंतर नेहा कोलमडून गेली होती. नेहाने एकामागून एक पोस्ट लिहून आपले दुःख व्यक्त केले होते. तिने लिहिले होते, 'मी माझे सर्वस्व त्याला दिले आणि त्या मोबदल्यात मला काय मिळाले.... मला काय मिळाले ते मी शेअरसुद्धा करु शकत नाही' 
    - खरं तर चाहते नेहा आणि हिमांशच्या लग्नाची वाट बघत होते. काही महिन्यांपूर्वी इंडियन आयडॉलच्या मंचावरच हिमांश कोहलीने नेहा कक्कडला प्रपोज करुन तिला सरप्राइज दिले होते. दोघांनीही या शोमध्येच एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली होती.
    - दिल्लीचा रहिवाशी असलेल्या हिमांशने 'यारियां' (2014) चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटातील 'सनी-सनी' हे गाणे नेहाने गायले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली होती.

    याचवर्षी झाले होते दोघांमध्ये भांडण
    जून 2018 मध्ये नेहा आणि हिमांश यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. तेव्हा नेहाने एक लांबलचक मेसेज लिहिला होता. ती म्हणाली होती, मी तुला माझे सर्वस्व दिले. लव्ह, केअर, टाइम, हॅपीनेस, रिस्पेक्ट, स्किल, नॉलेज, पॉझिटिव्हीटी, माझे लोक... माझे फॅन्स, इतकेच नाही तर मी मेहनतीने मिळवलेली प्रसिद्धीसुद्धा तुझ्यासोबत शेअर केली. पण तू मला क्षणात विसरला. तुझ्या अशा वागण्याने मी खूप दुखावली गेली आहे. मी खूप रडले. आता मी तुला माझे उत्तर देतेय, फाइनली गुड बाय अँड गॉड ब्लेस यू'

    - नेहाच्या या पोस्टनंतर हिमांशने तिच्यासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करुन तिची माफी मागितली होती. हिमांशने लिहिले होते, 'मला माफ कर, मी तुझ्यासोबत अतिशय रुड आणि वाईट वागलो. पण आपले नाते एवढे कमजोर नाही, की एखाद्या छोट्या चुकीने संपेल. मी तुला फक्त एवढेच सांगू इच्छितो की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते कायम राहिल.'Here Is Reason Behind Neha Kakkad Break Up With Himansh Kohli

Post a Comment

 
Top