0
 • नागपूर - वडधामना येथे दिराने वहिणीसह तीन वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर वहिणी आणि पुतणीच्या मृतदेहावर या नराधमाने पाशवी बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. भाऊ घरी नसताना दिराने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
  नागपूरच्या वडधामना येथे ही अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे आरोपीने भाऊ घरी नसल्याची संधी साधून वहिणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यानंतर रागात त्याने तिची हत्या केली. पण दिराच्या मनातील वासनेचा राक्षस तिची हत्या करूनही शांत झालेला नव्हता. त्यामुळे हत्येनंतर त्याने महिलेच्या मृतदेहावर पाशवी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने स्वतः पोलिसांना कबुली देत ही माहिती दिली आहे.

  पुतणीलाही मारले 
  वहिणीची हत्या आणि पार्थिवावर बलात्कार केल्यानंतर आरोपी पळून जायला निघाला होता. पण जाताना त्याना तीन वर्षांची पुतणी दिसली. ही पुतणी आपल्याला ओळखेल अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने तिचीही हत्या केली. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या चिमुरडीच्या मृतदेहावरही बलात्कार केल्याचे सांगितले आहे.

  पोर्न पाहण्याचे होते व्यसन
  आरोपी या घटनेनंतर फरार झाला होता. पण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याने या संपूर्ण घटनेविषयी माहिती दिली. आरोपीने सांगितले की, त्याला मोबाईलवर पोर्न पाहण्याचे व्यसन जडलेले होते. त्यामुळे कायम त्याच्या डोक्यात वासनेशी संबंधित विचार असायचे. या सर्वातूनच त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. दरम्यान, ही महिला मुस्लीम होती आणि तिने हिंदु व्यक्तीशी लग्न केलेले होते. त्यामुले कुटुंबीय या दाम्पत्यावर नाराज होते अशी माहितीही मिळाली आहे.

  आरोपीला मोबाईलवर पोर्न पाहण्याचे व्यसन जडलेले होते. त्यामुळे कायम त्याच्या डोक्यात वासनेशी संबंधित विचार असायचे.

  • Man murdered sister in law and niece and raped on their dead body in Nagpur

Post a Comment

 
Top