0
आयुर्वेदानुसार हळदीमध्ये मोहरी तेल मिसळून खाल्ल्याने जास्त फायदा मिळू शकतो, यामुळे कँसर, डायबिटीज, हार्ट अटॅक सारख्या आज

अनेक लोक थंडीच्या दिवसात जेवणासोबत हळद आणि तेल मिसळून खातात. याने जेवणाची चव वाढते. कँसर, डायबिटीज, हार्ट अटॅक सारख्या आजारांचा धोका टळतो. आयुर्वेदानुसार हळदीमध्ये मोहरी तेल मिसळून खाल्ल्याने जास्त फायदा मिळू शकतो. गव्हर्नमेंट आयुर्वेद हॉस्पिटल, जोधपूरचे सीनियर कंसल्टेंट डॉ. राजेंद्र कुमावर सांगत आहेत हळद आणि मोहरी मिसळून खाल्ल्याने मिळणारे फायदे. कसा होईल फायदा...


हळदी आणि मोहरी तेल दोन्हीही आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जातात. याच्या मिश्रणामध्ये या दोन्हींचे फायदे मिळू शकतात. याव्यतिरिक्त हळदीमध्ये तेल मिसळल्याने यामध्ये अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण दुप्पट वाढते. यामुळे हे खाणे जास्त फायदेशीर मानले जाते. हे मिश्रण बनवण्यासाठी एक चमचा कोमट मोहरीच्या तेलामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि चिमूटभर मीठ मिसळा. हे जेवणासोबत लोणचाप्रमाणे खावे. चव वाढवण्यासाठी भाजलेली हळद वापरता येऊ शकते.


वेदनेपासून आराम : हळदीमधील करक्यूमिन वेदनेपासून आराम देते. हळद आणि तेल मिसळून खाल्ल्याने बॉडीमधील प्रत्येक प्रकारच्या वेदना दूर करण्यात मदत मिळेल.


निरोगी त्वचा : हळदी आणि मोहरी तेल मिसळून खाल्ल्याने रक्त साफ होते. याने पिंपल्स, एक्ने, स्किन इन्फेक्शन, रॅशेज यांसारख्या समस्या टाळता येतात. त्वचेचा उजळपणा वाढतो.


यकृतासंबंधी आजार : हळद आणि तेल मिसळून खाल्ल्याने शरीराचे टॉक्सिन्स बाहेर निघतील. याने शरीराचे फंक्शन्स चांगले होतील. यकृताच्या आजारासंबंधी धोका टळेल.


किडनीची समस्या : हळद खाल्ल्याने किडनीचे कार्य चांगले होतात. याने किडनीसंबंधी समस्यांचा धोका टळतो.


निरोगी हृदय : हळद आणि तेल मिसळून खाल्ल्याने रक्त शुद्ध होते क्लॉटिंगची शक्यता कमी होईल. यामुळे रक्तप्रवाह सुधारतेे आणि हृदयासंबंधीच्या अाजाराचा धोका टळतो.


बध्दकोष्ठता : हळद आणि तेल मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. याने बध्दकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.


कर्करोगापासून बचाव : हळदीमध्ये मोहरी तेल मिसळल्याने यामध्ये अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण वाढते. याने कर्करोगाचा धोका टळतो.


मेमरी : हळदीमधील करक्यूमिन ब्रेन फंक्शन्स चांगले बनवते. रोज हळद आणि तेल मिसळून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.


अँटी एजिंग : हळद आणि मोहरी तेल मिश्रणामध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट्स असतात. नियमित हे खाल्ल्याने वाढत्या वयाचा प्रभाव कमी होते. दीर्घकाळ तरुण राहण्यास मदत मिळते.


मधुमेह : हळदीमध्ये नियमित मोहरी तेल मिसळून खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोज संतुलित राहण्यात मदत मिळते. याने मधुमेह संतुलनात राहते. याचा धोका टळतो.


सूज : तेलामध्ये हळद मिसळून खाल्ल्याने शरीरातील प्रत्येक प्रकारची सूज दूर होईल. या मिश्रणातील करक्यूमिन आणि अँटीऑक्सीडेंट्स सूज कमी करते.


दमा : नियमित हळद आणि तेलाचे मिश्रण खाल्ल्याने श्वास आणि कफची समस्या दूर होते. दम्याचा धोका टळतो.mustard oil and turmeric health benefits

Post a comment

 
Top