0

वास्तू टिप्स : घरामध्ये देवघर असल्यास कायम राहते पॉझिटिव्ह एनर्जी, परंतु काही गोष्टींकडे द्यावे विशेष लक्ष

घरामध्ये पूजनस्थळ म्हणजे देवघर असणे उत्तम राहते. यामुळे घरात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी राहते. हिंदू धर्मामध्ये पूजा आणि देवघराशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे शुभफळ प्राप्त होऊ शकतात. वास्तू शास्त्रामध्येही देवघराशी संबंधित काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या, देवघराविषयी कोणत्या गोष्टी आवश्यक...

1. देवघरात भगवान श्रीगणेश, लक्ष्मी आणि सरस्वती याच्या मूर्ती उभ्या स्थितीमध्ये नसाव्यात. यांच्या मूर्तीही बसलेल्या रूपात असाव्यात.

2. देवघर छोटे असल्यास तेथे जास्त मूर्ती ठेवू नयेत. रोज देवघराची स्वच्छता करावी. देवघरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.

3. पूजा करणाऱ्या व्यक्तीचे मुख पश्चिम दिशेला असणे शुभ राहते. यासाठी देवघराचे दार पूर्व दिशेला असावे.

4. देवघराजवळ बाथरूम आणि टॉयलेट असू नये. देवघरासमोर व्यवस्थिती ध्यान करण्यासाठी बसता येईल अशी जागा अवश्य रिकामी सोडावी.

5. देवघराच्या जवळपास अग्नीशी संबंधित उपकरण उदा. इन्व्हर्टर किंवा विद्युत मोटर नसावी.

6. देवघरात नेहमी मंद उजेड देणारा बल्ब लावावा. देवघरात अंधार आणि ओलावा राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.devghar vastu tips in marathi

Post a Comment

 
Top