0
संसद भवनाबाहेर ते म्हणाले, मोदी सरकारने काही उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटींचे कर्ज माफ केले.

नवी दिल्ली- देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झोपू देणार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बाेलताना म्हटले आहे.

संसद भवनाबाहेर ते म्हणाले, मोदी सरकारने काही उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटींचे कर्ज माफ केले. मात्र ४ वर्षांत शेतकऱ्यांना एका रुपयाचीही कर्जमाफी दिली नाही. आम्ही सरकार स्थापण्याच्या १० दिवसांत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये शपथविधीच्या सहा तासांतच त्याचा निर्णय घेतला. मोदींनी आधी सर्वात मोठा घोटाळा नोटबंदी आणि नंतर राफेल करारातून जनतेचा पैसा वाया घालवला आहे.

आसाममध्येही ६०० कोटींची कर्जमाफी
आसाममधील भाजप सरकारने मंगळवारी राज्यातील सुमारे ८ लाख शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. सोमवारी रात्री कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या एकूण कृषी कर्जाची २५ हजार रुपयांपर्यंतची २५% रक्कम माफ करण्यात येणार आहे.

देशभरात शेतकरी कर्जमाफीची लाट
तीन दिवसांत कर्जमाफीचा निर्णय घेणारे आसाम हे तिसरे राज्य आहे. सोमवारी मध्य प्रदेश व छत्तीसगडने कर्जमाफी दिली होती. याआधी महाराष्ट्र, कर्नाटक, यूपी व पंजाबमध्येही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. ओडिशात सत्तेत आल्यास कर्जमाफी देऊ, असे आश्वासन भाजपने दिले आहे.
Do not let Modi sleep till farmers get remission: Rahul

Post a comment

 
Top