0
8 जानेवारीआधी हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर व्हावे अशी सरकारची इच्छा आहे.

नवी दिल्ली - तीन तलाकला बेकायदेशीर ठरवण्याच्या संदर्भातील नव्या विधेयकावर गुरुवारी लोकसभेत चर्चा सुरू झाली. गोंधळादरम्यान केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी संसदेत विधेयक सादर केले. तर लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विधेयक जॉइंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी केली. पण लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विधेयकावर चर्चा सुरू करण्यास सांगितले. हे बिल यापूर्वी दोन वेळा लोकसभेत मंजूर झाले आहे. पण दोन्हीवेळा ते राज्यसभेत अडकले. यावेळी अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजे 8 जानेवारीआधी हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर व्हावे अशी सरकारची इच्छा आहे.Discussion over Tripple talaq bill in Lok Sabha

Post a comment

 
Top