0
छत्तीसगडमध्ये या निवडणुकीत भाजप-काँग्रेस-छत्तीसगड जनता काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.
रायपूर- छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढत आहे. काँग्रेस 60 तर भाजपने 23 जागेवर आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री रमन सिंह हे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतात की, काँग्रेस आपले सरकार स्थापन करते हे आजचा निकाल ठरवणार आहे.

दरम्यान, राज्यात 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते. एकूण 76.35% मतदान झाले होते.
छत्तीसगडमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलनुसार काँग्रेस बहुमतात.

- छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागा. 71 जागांचे कल समोर आले आहेत. काँग्रेसची 48 जागांवर आघाडी. 26 वर भाजप, चार जागा बसप आणि जनता काँग्रेस आघाडीला.

- मरवाहीमधून अजीत जोगी आघाडीवर

- मुख्यमंत्री रमन सिंह पिछाडीवर. काँग्रेसच्या उमेदवार करुणा शुक्ला आघाडीवर करुणा या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी आहे.

एकूण जागा: 90, मॅजिक फिगर: 46

आघाडी विजयी एकूण जागा 2013
भाजप 23 0 23 (-26) 49
काँग्रेस 60 36 60 (21) 39
इतर 7 0 7 (5) 2
तिरंगी लढत

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेस-छत्तीसगड जनता काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये बाहेर पडून अजीत जोगी यांना छत्तीसगड जनता काँग्रेस या पक्षाची स्थापना केली होती. तसेच अजीत जोगी यांच्या पक्षाने बसपसोबत आघाडी केली आहे.

जोगी-माया यांच्या आघाडीमुळे बदलले 30 जागांचे समीकरण
यावेळी अजीत जोगी आणि मायावती यांनी आघाडीने छत्तीसगडमध्ये 30 हून जास्त जागांचे समीकरण बदलले आहे. यामुळे भाजप, काँग्रेस आणि छत्तीसगड जनता काँग्रेस यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. एक्झिट पोल्समध्ये जनता काँग्रेस आणि बसपला 3 ते 8 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.

काय सांगतो एक्झिट पोल..? 
छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत. येथे 12 आणि 20 नोव्हेंबरला मतदान झाले. गेल्यावेळी भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागा जिंकल्या होत्या. यावेळी बसप आणि अ‍जीत जोगींचा छत्तीसगड जनता काँग्रेसची आघाडी आहे. जोगी 2016 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले होते.

सर्वे भाजप काँग्रेस इतर
इंडिया न्यूज-नेता 43 40 07
टाइम्स नाउ-सीएनएक्स 46 35 07
इंडिया टुडे-माइ एक्सिस 21-31 55-65 04-08
न्यूज नेशन 38-42 38-42 40-44 04-08
रमन सिंह हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले भाजप नेते...

किती वर्षे कधीपासून कधीपर्यंत
रमन सिंह (छत्तीसगड) 15 7 डिसेंबर 2003 पासून आतापर्यंत
शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश) 13 29 नोव्हेंबर 2005 पासून आतापर्यंत
नरेंद्र मोदी (गुजरात) 12 7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 पर्यंत
Chhattisgarh Election Result 2018 Live Updates

Post a comment

 
Top