0
सायरा यांचा आरोप - समीरने सरकारी कर्मचा-यांच्या मदतीने प्रॉपर्टीचे बनावट कागतपत्र बनवले

बॉलिवूड डेस्क. पद्मविभूषण आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार(95) यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत मागितली आहे. त्यांनी लिहिले की, भू माफिया समीर भोजवानी त्यांना आणि दिलीप कुमार यांना धमकी देत आहे. तक्रार दाखल करुनही त्याच्याविरुध्द कोणतीही कारवाई केली जात नाही. सायरा बानो यांनी मोदी यांची भेट घेण्याचीही मागणी केली आहे. समीर भोजवानीने वांद्राच्या पाली हिल क्षेत्रात दोन प्लॉटवर त्याचा दावा केला होता. यामध्ये दिलीप कुमार यांचा बंगला आहे.

सायराने दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरुन लिहिले की, सायरा बानोकडून निवेदन - माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर, भू-माफिया समीर भोजवानी तुरुंगातून सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही कोणतीही कारवाई केली जात नाही. पद्मविभूषितला धोका देण्यात आला आहे. त्यांना पैसे आणि बाहुबलने धमकावले जातेय. मुंबईमध्ये तुमची भेट घेण्याचे निवेदन आहे.
dilip kumar wife Saira Banu Khan Requested on twitter, meet with PM Modi

Post a Comment

 
Top