0
दुष्कर्मातील जामिनावरील संशयिताकडून त्रास होत असल्याचा आरोप

सोलापूर- दुष्कर्म व विनयभंग प्रकरणातील संशयित आरोपीस अटकपूर्व जामीन मिळाल्याविरुद्ध आणि अारोपीकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर एका तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. करमाळा तालुक्यातील सारंग श्रीदत्त सरडे या तरुणाविरुद्ध पीडित तरुणीने बार्शी पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून सरडेविरुध्द पोलिसांनी कारवाई करावी यासाठी तरुणीने प्रयत्न केले होते. त्यानंतर सरडे यास अटकपूर्व जामीन मंजूर झाला.

दरम्यान ही तरुणी यापूर्वी दोन ते तीन वेळा अधीक्षकांना भेटण्यासाठी आली होती. त्याचप्रमाणे मंगळवारी चारच्या सुमारास अधीक्षक कार्यालयाजवळ आली होती. सोबत आणलेले बाटलीतील विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला पोलिस अडसूळ व इतरांनी त्या तरुणीला ताब्यात घेत पीडितेच्या हातातील विषारी द्रव्य असलेली बाटली काढून घेतली.

'बार्शी पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला जामीन कसा मिळाला,' असे आेरडत 'मी येथेच आत्महत्या करते' म्हणून गोंधळ करत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातातील दोन पानी चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये आरोपी विरुद्ध दिलेल्या तक्रारीचा अाशय होता. आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद आहे. याबाबत मनीषा अडसूळ यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पीडितेविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.Girls sucide attemt unfront of Poltice station

Post a comment

 
Top