सुमीत वाघमारेचा भाग्यश्रीचा भाऊ बालाजीने मित्र संकेत वाघच्या मदतीने धारदार शस्त्राने खून केला होता.
- बीड- प्रेमप्रकरणानंतर विवाह केलेल्या सुमीत वाघमारेची मेहुण्यानेच मित्राच्या मदतीने भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून बुधवारी हत्या केली होती. यानंतर फरार झालेल्या दोघांनी तिसऱ्या दिवशीही पोलिसांना गुंगारा दिला. दरम्यान, हत्येचा थरार एका सीसीटीव्हीत कैद झाला असून नियोजनबद्धरीत्या हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्या अनुषंगानेही इतर काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
बुधवारी अभियांत्रिकीची परीक्षा देऊन दुचाकीवरून पत्नी भाग्यश्रीसोबत परतणाऱ्या सुमीत वाघमारेचा भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगेने मित्र संकेत वाघच्या मदतीने दुचाकीला कार आडवी लावून धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केला होता. भाग्यश्रीच्या समोरच हा प्रकार घडला होता. दरम्यान, हत्येनंतर दोघेही फरार झालेत. गुरुवारी दुपारनंतर ज्या कारमधून ते आले होते तीकार अयोध्यानगर परिसरात सापडली, मात्र तिथून ते कुठे गेले, त्यांना कुणी मदत केली या अनुषंगाने सध्या पोलिस तपास करत आहेत. हा सगळा प्रकार नियोजनबद्धरीत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे इतर काही जणांकडेही चौकशी करण्यात येत आहे. कार सोडून पळून जाताना परिसरातील सीसीटीव्हीत ते कुठे दिसत आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, ज्या सीसीटीव्हीत हत्येचा थरार कैद झाला ते फुटेज पोलिसांना पुढे दोषारोपपत्र व न्यायालयात मोठा पुरावा ठरणार आहे. त्यासाठी पोलिस कसून तपास करत आहेत.कसोशीचे प्रयत्न> फरार आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. तपासासाठी नेमलेली पथके कसोशीने आरोपींचा शोध घेत आहेत. सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे.- अजित बोऱ्हाडे, अपर पोलिस अधीक्षक.
Post a Comment