0
राधानगरी-कोल्हापूर मार्गावर असणाऱया आवळी बुदुक येथे पूलाशेजारी असलेली ऊस वाहतूक केवळ विद्युत तारांमुळे शेतकऱयांच्या जीवावर बेतणारी आहे. या धोकादायक ताऱयांमुळे पाच एकरातील ऊसतोड खोळंबली आहे. याचा फटका येथील शेतकऱयांना बसणार आहे.
भोगावती नदीच्या काठावर असलेल्या मळा (तळ) या पाच एकर रानात ऊस पिक घेतले आहे. राधानगरी-कोल्हापूर मार्गावर पूराचे पाणी रस्त्यावर येवू नये म्हणून नवीन पूल बांधून रस्ता रूंदीकरणासह उंचीकरण केले आहे. मात्र येथे उच्च दाबाच्या विद्युत वाहीनी गेलेली आहे. या वाहीनीच्या तारा ऊस वाहतूक करण्यासाठी अडथळा निर्माण करणाऱया आहेत. याचा स्पर्श झाला तर जिवितहानी होण्याची भिती संबंधित शेतकरी वर्गातून होत आहे.
या विद्युत वाहिनी शेजारीच नळपाणी पुरवठा करणारी डी.पी. आहे. तसेच येथून ऊस काढण्याचा मार्ग आहे. तसेच ऊस तोड करण्यासाठीही तोडणी मजूरांना धोकादायक बनले आहे. रस्ता उंचीकरण केल्यामुळे या ठिकाणी अशी धोकादायक स्थिती बनली आहे. या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या संबंधीत कर्मचारी व अधिकारी यांना कळविले आहे. शिवाय ग्रामपंचायतीनेही लेखी तक्रार करून ही वाहिनी उंचीवर जोडाव्यात किंवा या वाहिनीतून 150 फूट 70 एमएमची केबल ओढून मिळावी अशी मागणी केली होती. सद्या या समस्येमुळे येथील शेतकऱयांची ऊसतोड लांबली आहे. याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार आहे. याची दखल घेवून वीज वितरण कंपनीने त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Post a Comment

 
Top