मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल, एका निर्णयाने उजडले अख्खे कुटुंब
- कोइम्बतूर- तामिळनाडूतील शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबात दोन वर्षीय चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी वडिलांना कळताच त्यांनीही राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनिकंदन असे मृत वडीलांचे नाव असून देजश्विन असे चिमुरड्याचे नाव आहे.खेळात उजडले संपूर्ण कुटुंबपोलिसांना सांगितल्यानुसार, मृत मनिकंदन आपल्या 5 वर्षाच्या मुलीसोबत लपाछपीचा खेळ खेळत होते. त्यांची पत्नी घरात झोपलेली होती. तर चिमुरडा देजश्विन घरात इकडेतिकडे फिरत होता. त्यानंतर काही काळाने अचानक तो बेपत्ता झाला. जवळपास एक तासानंतर मृत मनिकंदन यांचे लक्ष गेल्यानंतर त्यांना पाण्याच्या टाकीत मृत देजश्विन बुडालेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी लपण्याचे बहाने सांगून मुलीला छतावर पाठवले. दरम्यान त्यांनी खोलीत जाऊन आतून खोलीचे दार बंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.पतीने पंख्याला लटकून घेतला गळफास
पोलिसांच्या माहितीनुसार, बऱ्याच वेळेने मृत मनिकंदन यांची पत्नी त्यांच्या खोलीजवळ गेल्यानंतर तिने खोलीचे दार वाजवले. परंतु खोलीतून काहीच प्रतिक्रीया येत नसल्याने पत्नीने शेजारच्यांना बोलावले. त्यानंतर शेजारच्यांनी मृत मनिकंदन यांच्या खोलीचे दार तोडले. तेव्हा खोलीत मृत मनिकंदन पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले.
6 वर्षांआधी झाला होता विवाह
मनिकंदन यांचा सहा वर्षांआधी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले होती. दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने बापानेही आपले जिवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Post a Comment