0
वॉशिंगटन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धग्रस्त सीरियातून आपले सर्वच सैनिक परत बोलावण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवादविरोधी लढ्यात आपण इस्लामिक स्टेटचा (आयसिस/आयएस) पराभव केला. त्यामुळे, सर्वच सैनिकांना त्यांच्या घरी बोलावण्याची वेळ आली असे ट्रम्प यांनी जाहीर केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना या निर्णयावरून त्यांच्याच पक्षातून विरोध होत आहे. सीरियात आयसिसचा अजुनही पूर्णपणे पराभव झालेला नाही. अशात सैन्य परतीचे आदेश देऊन ट्रम्प ओबामांप्रमाणेच मोठी चूक करत आहेत अशी टीका त्यांचे पक्ष रिपब्लिकनकडून केली जात आहे.Trump orders all US troops in Syria to home, allies dispute

Post a comment

 
Top