0
वाई : वाई-मांढरदेव मार्गावरील मांढरदेव घाटात एसटीचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले. यामुळे एसटीवरील ताबा सुटल्याने एसटी नाल्यात गेली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला अन् एसटीतील तीसही प्रवासी सुखरूप आहेत. हा अपघात रविवारी सकाळी झाला.
याबाबत माहिती अशी की, बालेघरहून वाईला येत असलेली वाई-बालेघर (मांढरदेव) एसटी (एमएच १४ बीटी ३५८३) ही बस रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मांढरदेव घाटात आली. एसटी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान ओळखून एसटी बस दरीच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या नाल्यात नेली.
अपघात झाला तेव्हा गाडीतून तीसजण प्रवास करत होते. चालकाने प्रसंगावधानता दाखविल्याने गाडीतील कोणत्याही प्रवाशाला खरचटलेही नाही.
ST directly into the Nala due to stair lock in Mardhardev Ghat | मांढरदेव घाटात स्टेअरिंग लॉक झाल्याने एसटी थेट नाल्यात

Post a Comment

 
Top