0
नाजूक राणीला झोपताना फुलांच्या पाकळ्यांच्याही त्रास झाला, तेव्हा राजा म्हणाला- गरीब लोक जमीन आणि दगडावरही आरामात झोपतात

प्राचीन काळी कौशलपूरच्या राजाची राणी अत्यंत नाजूक होती. या राणी अर्धवट उमललेल्या पाकळ्यांवरच शांत झोप लागत होती. एका रात्री सेवकांच्या चुकीमुळे काही पूर्ण उमललेल्या पाकळ्या राणीच्या अंथरुणावर अंथरण्यात आल्या. फुलांच्या या पाकळ्या राणीच्या शरीराला टोचू लागल्या आणि यामुळे तिची झोपमोड झाली.


> राणीला असे अस्वस्थ पाहून राजाच्या तोंडून शब्द निघाले की, गरीब लोक तर थंड जमीन आणि दगडांवरही शांत झोपतात आणि तुला फुलाच्या पाकळ्याही टोचत आहेत.


> राजाच्या अशा बोलण्यामुळे राणी दुखी झाली आणि त्याच क्षणी राजऐश्वर्य सोडून कामगारांप्रमाणे जीवन जगण्याची घोषणा केली. राणीने राजाला सांगितले की पुढील दोन वर्ष मी कामगारांप्रमाणे राहणार आणि कोणीही माझा शोध घेऊ नये. मी स्वतः दोन वर्षांनी येथे परत येईल.


> दुसऱ्या दिवशी सकाळीच राणी शेजारील राज्यात जाण्यासाठी निघाली. दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर तिला तेथील राजाच्या नवीन महालाचे बांधकाम चालू असल्याचे दिसले.


> राणी तेथेच काम करू लागली. सुरुवातील तिला खूप त्रास झाला कारण तिने कधीही एवढे कष्टाचे काम केलेले नव्हते. परंतु तरीही राणीने हार न मानता कष्ट चालूच ठेवले. मिळेल ते अन्न खाऊन चटईवर झोपत होती. कामाच्या थकव्यामुळे तिला लगेच झोप लागत होती. अशाप्रकारे दोन वर्ष निघून गेले.


> दोन वर्षानंतर राजा शेजारील राज्याच्या राजाकडे कामानिमित्त गेला. नवीन महालात त्याने आपल्या राणीला ओळखले. हे तेथील राजाला समजल्यानंतर त्याने लगेच राणीला मान-सन्मानाने बोलावून घेतले आणि कामातून मुक्त करून राजाची माफी मागितली.


> राणीने त्या राजाचे आभार मानले आणि म्हणाली मला तुमच्या येथे येऊन कष्टाचे महत्त्व कळले.


> त्यानंतर राणी आपल्या राजासोबत परत राज्यामध्ये आली परंतु तिने कष्ट करणे सोडले नाही.


कथेची शिकवण
या कथेमध्ये शारीरिक कष्टाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. शरीराला कष्ट नसतील तर विविध आजाराने शरीर ग्रस्त आणि नाजूक होते. यामुळे कष्ट आपल्या जीवनाचे अनिवार्य अंग असावे. उत्तम आरोग्यासाठी आपण दररोज काहीवेळ शारीरिक परिश्रम करणे आवश्यक आहे.inspirational story about healthy life

Post a Comment

 
Top