0
कार्यकर्त्यांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.
मुंबई - केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यावर एका कार्यकर्त्याने हल्ला केला. अंबरनाथ येथे शनिवारी रात्री त्यांच्याच पक्षातील एका कार्यकर्त्याने आठवलेंना चापट मारली. येथे एका समारंभात आठवलेंनी उपस्थिती लावली असताना ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मंचावरून उतरलेल्या आठवलेंना आधी धक्का दिला. यानंतर त्यांच्यावर हात उगारला. मंत्र्यांच्या समर्थकांनी वेळीच त्याला आवरले. हल्लेखोराने त्या समर्थकांवर सुद्धा वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समर्थकांनी आरोपीला चोप दिला. घटनास्थळी उपस्थित असेलल्या पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेनंतर आठवले मुंबईला रवाना झाले.

कार्यकर्त्यांना राजकीय कटाचा संशय
या हल्ल्यानंतर आठवले समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली. रात्री उशीरा आरपीआय कार्यकर्ते आठवले यांच्या निवासस्थानी गोळा झाले. त्यांच्या मते, रिपाइं नेत्यांवर झालेला हा हल्ला एक मोठा राजकीय कटकारस्थान आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली. परंतु, त्यामागच्या सूत्रधाराला अद्याप पकडण्यात आलेले नाही. त्याचा हल्ल्यामागचा हेतू काय होता याची चौकशी व्हायलाच हवी. सोबतच, कार्यकर्त्यांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.RPI leader ramdas athawale attacked at an event in Ambarnath

Post a comment

 
Top